Whatsapp ट्रिक्स मित्रहो आपल्या मनात whatsapp बाबत शंका असेल की माझा whatsapp कोणी hack करील काय ? याचे उत्तर हो आहे , ते आपल्या जव...
Whatsapp ट्रिक्स
मित्रहो
आपल्या मनात whatsapp बाबत शंका असेल की माझा whatsapp कोणी hack
करील काय ? याचे उत्तर हो आहे , ते आपल्या जवळील व्यक्तीस सहज
शक्य आहे , ती पद्धत आहे whatsapp web द्वारे , आपल्या सर्वांना माहिती आहे की
आपला whatsapp pc वर किंवा दुसऱ्याच्या
मोबाईलवर whatsapp web द्वारे चालू शकतो
ते कसे एक वेळ पाहू
सर्वप्रथम मोबाईल व PC चा
नेट कनेक्शन सुरु करा
PC वर www.web.whatsapp.com ही website
ओपन करा किंवा मोबाईल
मध्ये गुगल प्ले स्टोर मधून whatsapp web app डाऊनलोड करून ओपन करा
आता स्क्रीन वर एक QR code येईल
आपल्या मोबाईल मधला whatsapp app सुरु करा
उजव्या बाजूवरील तीन टिंब असतील त्याच्यावर क्लिक करा , येणाऱ्या पॉप ऑप विंडो मधील
तिसरा पर्याय whatsapp
web वर क्लिक करा
www.aapalathakare.blogspot.in
आता येणाऱ्या स्क्रीन वरून Pc किंवा दुसऱ्याच्या whatsapp web मधील QR
code स्कॅन करा
आपला whatsapp
आता pc किंवा दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये
सुरु होईल
आता मित्रहो विचार करा तुम्हाला whatsapp web मधून logout
होण्याचे माहिती नसेल तर
काय होईल ?
तुम्ही नुसता एक मिनिटासाठी दुसऱ्याला आपला मोबाईल दिला आणि त्याने
whatsapp web वर तुमचा whatsapp मधून QR code स्कॅन केला तर काय होईल ?
याचे उत्तर आहे आपला whatsapp hack झाला आहे
आता आपल्या whatsapp वर त्या माणसाचा नियंत्रण असेल तो आता आपला प्रत्येक मेसेज वाचेल
आणि reply सुद्धा देईल
अशा प्रकारे कोणीही आपल्या whatsapp ची hacking करू नये या साठी whatsapp ने Two step verification सुविधा नव्याने दिली आहे
ती कशी करावी हे पाहूया
सर्वप्रथम आपला whatsapp ओपन करा
वर उजव्या कोपऱ्यात तीन टिंब असतील त्याच्यावर क्लिक करा , त्यातील सर्वात शेवटी settings वर क्लिक करा
account वर क्लिक करा व आता तिसरा पर्याय Two step verification वर क्लिक करा
त्यात सर्वात खाली हिरव्या रंगात ENABLE चा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा
आता एक स्क्रीन येईल त्यात सहा क्रमांकाचा पासवर्ड तयार करून तो
पासवर्ड टाका व next
वर क्लिक करा , परत तोच पासवर्ड confirm password मध्ये क्लिक करून
नेक्स्ट वर क्लिक करा
पुढच्या स्टेप मध्ये जर आपण आपला पासवर्ड विसरले असल्यास तो recover करण्यासाठी आपला रजिस्टर ईमेल
आयडी टाका व खाली नेक्स्ट च्या बटनावर
क्लिक करा , पुढच्या स्टेप मध्ये confirm email address मध्ये परत तोच ईमेल आयडी
type करून खाली असलेल्या save बटनावर क्लिक करा
आता एक प्रोसेस होऊन Two step verification is
enabled असा मेसेज येईल , खाली आपण Done वर क्लिक करा
अशा प्रकारे आपल्या whatsapp मधील टू स्टेप वेरीफिकेशन ही प्रक्रिया पूर्ण झाली असेल
आपल्याला वाटले तर परत आपण या पर्याया मध्ये येऊन आपला पासवर्ड व
ईमेल आयडी बदलू शकतो
ही प्रक्रिया केली तर आपल्या whatsapp मधून कोणीही whatsapp web वर QR
code स्कॅन करू शकत नाही व hack करू शकत नाही
आपल्याला ही प्रक्रिया नको असेल तर कोणालाही whatsapp वापरायला दिल्यास whatsapp मधील whatsapp web ओपन करा तिथे आपण केव्हा
whatsapp web वर अक्टिव होते ते लास्ट activity दिसेल
तेव्हा आपण log out from all computers
क्लिक केल्यास whatsapp web मधून लॉगआउट होऊ त्यामुळे
दुसरा कोणीही आपला whatsapp
account वापरणार नाही
Nice
उत्तर द्याहटवाधन्यवाद असचं ब्लॉगला भेट देत रहा...
उत्तर द्याहटवा