⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एक्सेल: कॉपी शीट व बहुपयोगी पेस्ट ऑप्शन्स

एक्सेल: कॉपी शीट व बहुपयोगी पेस्ट ऑप्शन्स




एक्सेलमधील काही सोप्या क्लुप्त्या ज्या आपणास नेहमी उपयोगी ठरतील. जसे शीट जाशीची तशी कॉपी पेस्ट केल्यास काही समस्या येतात. पेस्ट करताना आपण एकच पेस्ट ऑप्शन वापरतो. अधिक पेस्ट ऑप्शनचा वापर केल्यास कमी वेळेत जास्त काम होईल. 

कॉपी शीट :



शीट जशीच्या तशी कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+A करून Ctrl+V केले तर कॉलम विड्थ आणि रो हाईट व इतर अनेक बदल होतात. त्यासाठी पुढील सोपी पद्धत वापरावी.

1.      जे शीट कॉपी करायचे आहे त्याच्या नावावर राईट क्लिक करा.
2.      Move or Copy ऑप्शन निवडा.
3.      Create a copy ला चेकमार्क करा.
4.      Before sheet मधून योग्य तो ऑप्शन निवडा. जसे शीट शेवटी हवी असल्यास Move to End निवडा.
5.      ओके क्लिक केल्याबरोबर तुमची शीट जशीच्या तशी डूब्लीकेट झाली असेल. शीटचे नाव काहीसे असे दिसेल Sheet 1 (2) ते राईट क्लिक करून Rename करा.

पेस्टिंग ऑप्शन्स:



एक्सेल मध्ये कॉपी केलेल्या सेलच्या विविध पेस्ट ऑप्शन्स आहेत. त्यामुळे आपला कित्येक मिनिटांचा वेळ वाचेल व कामात अचूकता येईल.
राईट क्लिक करून Paste Special निवडल्या अनेक ऑप्शन्स दिसतील, त्यापैकी काही ऑप्शन्स..

§  Formulas: फक्त सूत्रे पेस्ट करण्यासाठी
§  Values: यामध्ये सूत्रे निघून जातात, त्या सेलच्या किंमती फक्त मिळतात.
§  Formats: यामध्ये सूत्रे अथवा त्याची किंमत पेस्ट न होता फक्त फॉरमॅट (रंग, फॉन्ट, इ.) पेस्ट होतो.
§  Transpose: या कमांडमुळे रोमधील कंटेंट कॉलममध्ये व कॉलममधील कंटेंट रोमध्ये पेस्ट करता येतो.
§  या शिवाय पेस्ट केलेल्या जागेवर एक ऑप्शन चिन्ह येते येथे क्लिक केल्यावर वरील ऑप्शन चिन्हरुपात दिसतात. ऑफिस २०१३ मध्ये माऊस ओव्हर पेस्ट प्रीव्हीव्ह दिसतो.

Column width:

कॉलम विड्थ दोन कॉलमच्या मध्ये डबल क्लिक केल्यावर आपोआप adjust होते. सर्व शीट सिलेक्ट करून कोणत्याही दोन कॉलम मध्ये डबल क्लिक केल्यास सर्व कॉलम एका वेळी adjust होतात.

Row height: 

कॉलम विड्थ प्रमाणे adjustment करावी.

Format Painter:



Home मेनुतील Format Painter च्या मदतीने कमी वेळात इतर सेलमधील Format आपणास हव्या असणाऱ्या सेलला देता येतो.

1.      प्रथम होम मधून Format Painter निवडा.
2.      ज्या सेलचा Format हवा आहे ती सेल निवडा. (Source)
3.      आता जेथे तो Format पाहिजे ती सेल अथवा सेल रेंज निवडा. (Target)
एक्सेलमधील डाटा सर्व Format सहित वर्डमध्ये पेस्ट केल्यास कमी वेळेत चांगले टेबल तयार होते. 

ही माहिती आपणास नेहमी एक्सेल वापरताना उपयोगी पडू शकते.
From - संजय गोरे सर 
धन्यवाद..!


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम