Excel: Absolute, Relative & Mixed Cell References चा उपयोग Excel मध्ये सेल रेफरन्स खूप महत्त्वाचा आहे. Absolute, Relative ...
Excel: Absolute, Relative & Mixed Cell References चा उपयोग
Excel मध्ये सेल रेफरन्स खूप महत्त्वाचा आहे. Absolute,
Relative & Mixed हे सेल रेफरन्स समजून घेणे गरजेचे आहे. यामुळे आपला बराच
वेळ वाचणार आहे. चला तर पाहूया कसे ते?
Relative Cell Reference:
एक्सेलमध्ये सूत्र लिहून उभे अथवा आडवे ड्रॅग केले तर डिफॉल्ट ड्रॅगने Relative Cell Reference कॉपी पेस्ट होतो. जसे – वरील चित्रात दिसते आहे.
§ F2
मध्ये =SUM(C2:E2) लिहून
(त्या सेलच्या उजवीकडील खालच्या डॉटला धरून) खाली ड्रॅग केले;
हवा तो रिझल्ट मिळाला.
§ सेल
ड्रॅग होताना रेफरन्स बदलतात. हे रेफरन्स Relative आहेत.
Absolute Cell Reference:
पण कधी कधी हा रेफरन्स बदल नको असतो त्यावेळी Absolute
Cell Reference वापरावा लागतो.
जसे वरील चित्रात G कॉलममध्ये जर J2 सेलमधील संख्या मिळवायची असेल तर –
§ जर G2
मध्ये =F2+J2 लिहून
ड्रॅग केले तर हवा तो रिझल्ट मिळत नाही.
§ येथे
सूत्रात थोडा बदल करून तो रेफरन्स =F2+$J$2 असा
करावा लागेल.
सेल रेफरन्स पटकन वापरण्यासाठी शॉर्टकट:
formula bar मध्ये जाऊन J2 ला क्लिक करा आणि F4 की दाबा. पुढील बदल दिसेल..
formula bar मध्ये जाऊन J2 ला क्लिक करा आणि F4 की दाबा. पुढील बदल दिसेल..
§ पहिल्यांदा
F4 की दाबल्यास $J$2 असा.......
कॉलम व रो दोन्ही फिक्स
§ दुसऱ्यांदा
F4 की दाबल्यास J$2 असा..........
कॉलम बदलता रो फिक्स
§ तिसऱ्यांदा
F4 की दाबल्यास $J2 असा.........
कॉलम फिक्स रो बदलता
§ तर
चौथ्यांदा F4 की दाबल्यास J2 असा........
कॉलम व रो दोन्ही बदलणारे
पुन्हा हीच की दाबल्यास हा क्रम रिपीट होईल.
हे reference चे विविध प्रकार खूप उपयोगी आहेत.
हे reference चे विविध प्रकार खूप उपयोगी आहेत.
आता सेल ड्रॅग करा. हवा तो रिझल्ट मिळाला...
Mixed Cell Reference:
कधी कधी एक्सेलमध्ये सेलना उभे अथवा आडवे ड्रॅग केल्यास
काही रेफरन्स Relative तर काही Absolute
वापरावे लागतात. खालील ठराविक गुण असणारे विद्यार्थी
मोजण्याचे उदाहरण पहा.
§ येथे
C13 मध्ये COUNTIF($C$2:$C$11,B13) सूत्र
लिहून खाली व नंतर समोर ड्रॅग केल्यास त्याच स्तंभात रिझल्ट मिळतो. पुढील स्तंभात
हवा तो रिझल्ट मिळत नाही. यासाठी तुम्ही कदाचित d1, e1 मधील
सूत्रे बदलून ड्रॅग करूनही मिळवाल पण हे क्लीस्ट होईल जर खूप स्तंभ असतील तर..!
§ यासाठी
C13 सेलमध्ये सूत्रात =COUNTIF(C$2:C$11,$B13) असा
बदल करा. आणि उभे आणि आडवे ड्रॅग करून पहा हवा तो रिझल्ट...!!!
येथे काय झाले ते पाहूया..
§ C$2:C$11
यामुळे रो नंबर 2 ते 11
absolute (फिक्स) राहिल्या; पण
कॉलम Relative आहेत.
§ $B13
यामुळे B कॉलम
absolute (फिक्स) राहिला पण रो Relative
आहेत.
§ अशा
प्रकारे तुम्ही Absolute, Relative व Mixed
सेल रेफरन्स वापरून आपले काम सुलभ,
स्मार्ट करू शकता.
From - संजय गोरे सर
Good information
उत्तर द्याहटवा