Lock Cells or Protect Worksheet मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील सेल्स लॉक केल्यामुळे त्या शीटमधील सूत्रे बदलली जाणार नाहीत. ज्या सेलमधील किं...
Lock Cells or Protect
Worksheet
मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील सेल्स लॉक केल्यामुळे त्या शीटमधील सूत्रे
बदलली जाणार नाहीत. ज्या सेलमधील किंमती एडीट करावयाच्या असतील त्या तेवढ्या
बदलण्यासाठी खुल्या ठेऊ शकतो. यामुळे चुकूनही सूत्रे लिहलेली सेल सिलेक्ट होऊन
त्यातील सूत्र बदलले जाणार नाही.
1.
सुरुवातीस तुमचे
शीट तयार करून घ्या.
2.
ज्या सेलमधील
किंमती वारंवार बदलावयाच्या असतील त्या सेल सिलेक्ट करा.
3.
जर सेल अनियमित
क्रमाने असतील तर सेल सिलेक्ट करताना Ctrl बटणाचा वापर करा.
4.
सिलेक्ट केलेल्या
सेलला राईट क्लिक करून Format cells निवडा
5.
Protection टॅब मध्ये जाऊन Locked चा चेकमार्क काढा आणि OK निवडा.
6.
Review मेनुतून Protect Sheet निवडा.
7.
Select Locked Cells चा चेकमार्क
काढा. Select unlocked cells ला चेकमार्क
राहूद्या.
8.
आवश्यक वाटल्यास
पासवर्ड टाका. ओके करा. फाईल सेव करा.
तुमचे वर्कशीट प्रोटेक्ट झाले आहे. आता तुम्ही सूत्रे लिहिलेली
अथवा इतर सेल्स सिलेक्ट करू शकत नाही.
प्रोटेक्शन आणि पासवर्ड देऊन अशी फाईल तुम्ही इतरांना देऊ शकता.
From - संजय गोरे सर प्रोटेक्शन आणि पासवर्ड देऊन अशी फाईल तुम्ही इतरांना देऊ शकता.
COMMENTS