एका Excel मध्ये अनेक Password देणे एक्सेल फाईलच्या एकाच शीटवरील कंटेंट अनेक युजरना एडीट करण्याची संधी द्यायची आहे. पण इतरांचा कंटेंट बद...
एक्सेल फाईलच्या एकाच शीटवरील कंटेंट अनेक युजरना एडीट करण्याची
संधी द्यायची आहे. पण इतरांचा कंटेंट बदलता येऊ नये यासाठी काय करता येईल?
एकच फाईल!!
एक शीट..
प्रत्येकाला वेगळी रेंज, अन् वेगळा पासवर्ड...!!!!
चला तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलला
कामाला लाऊया...
1.
प्रथम
एक्सेलमध्ये आपले जे लेखन आहे ते पूर्ण करून घ्या.
2.
आता एक्सेलमधील
जी रेंज एका युजरला पासवर्ड देऊन लॉक करावयाची आहे ती रेंज निवडा.
3.
REVIEW मधील Allow Users to Edit
Ranges ला क्लिक करा.
4.
एक बॉक्स अवतरेल.
त्यातील New ला क्लिक करा.
5.
आता New Range बॉक्स मधील Title पुढे Range1 दिसेल ते हवे असेल तर बदला.
6.
Refers to cells आपोआप आली असेल.
7.
महत्त्वाचा
मुद्दा Range Password जो तुम्हाला हवा
तो टाका फक्त तो लक्षात ठेवाच. OK वर क्लिक करून
पुन्हा तोच पासवर्ड टाकून कन्फर्म करा.
8.
आता खालीलप्रमाणे
दिसेल.
9.
आणखी दुसरी रेंज
सिलेक्ट करून वेगळा पासवर्ड देण्यासाठी New वर क्लिक करा New Range बॉक्स मधील Title पुढे Range2 दिसेल ते हवे असेल तर बदला.
10. Refers to cells च्या टेक्स्ट बॉक्स समोरील लाल बाणाचे चिन्ह प्रेस करून दुसरी
वेगळी रेंज सिलेक्ट करा. आणि
11. Range Password आता वेगळा लिहा व कन्फर्म करा.
12. तळाच्या डावीकडील Protect Sheet ला निवडा.
13. Select locked cells
व Select unlocked cells ला चेकमार्क राहूद्या. येथे हवा असेल तर शीटचा मास्टर पासवर्ड
टाका. (ही फाईल इतरांना देणार आहात म्हणून पासवर्ड द्यावा लागेल.) ओके करा.
14. आता प्रोटेक्ट केलेल्या रेंजमध्ये लिहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला
पासवर्ड विचारेल. त्या रेंजचा योग्य पासवर्ड लिहून रेंजमध्ये लिहू शकता का ते पहा.
15. दुसऱ्या रेंजमध्ये लिहिताना वेगळा पासवर्ड द्यावा लागेल याची
खात्री करा.
छान...!
तुम्ही अशा प्रकारे एका शीटवर हवे तेवढे युजरपासवर्ड / रेंज तयार करून फाईल इतरांशी शेअर करू शकता. फक्त प्रत्येकाला योग्य तो पासवर्ड द्यावा लागेल एवढेच..!!
तुम्ही अशा प्रकारे एका शीटवर हवे तेवढे युजरपासवर्ड / रेंज तयार करून फाईल इतरांशी शेअर करू शकता. फक्त प्रत्येकाला योग्य तो पासवर्ड द्यावा लागेल एवढेच..!!
COMMENTS