UMANG APP उमंग app
सरकारी सेवा आता आपल्या मोबाईलवर
एक अॅप, कामे अनेक
हे अॅप आरोग्य, शिक्षण, गॅस बुकिंग, पेंशनसहीत अनेक सुविधा देते. या माध्यमातून तुम्हाला आधारची माहितीही मिळेल.
भारत, इंडेन आणि एच.पी अशा कोणत्याही कंपनीचा तुमचा घरगुती गॅस असेल तर या अॅप मधून तुम्ही बुक करु शकता.
पासपोर्टसंबंधी कोणतेही काम करु इच्छित असाल तर या अॅपने ते सहज पार पडेल.
यामाध्यमातून तुम्ही पी.एफ कॉंट्रीब्यूशन आणि यासंदर्भातील माहिती मिळवू शकता.
जर तुमचे ड्रायविंग लायसन्स डिजिटल लॉकरमध्ये असेल तर या अॅपच्या मदतीने ते डाऊनलोडही करु शकता.
पॅन कार्ड संबंधी कोणतेही काम करु इच्छित असाल तर या अॅपने ते सहज शक्य आहे.
अशा प्रकारच्या 150 पेक्षा जास्त आवश्यक सेवांचा लाभ तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.
उमंग 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध
उमंग अॅप एक गेटवे आहे. याच्या माध्यमातून तुम्ही अनेक सरकारी अॅप्स एक्सेस करु शकता. त्यांच्या सुविधा मिळवू शकता.
या अॅपमध्ये इंटरनली अनेक अॅप इन्स्टॉल आहेत. तरीही हे अॅप मोबाईलमध्ये जास्त जागा घेत नाही.
हे अॅप इंग्रजी, मराठी, हिंदी सह 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
तुम्हाला कुठे मिळणार हे अॅप
गुगल प्लेस्टोअर, अॅपल अॅप स्टोअर आणि विंडोज स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. तेथून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करु शकता.
अॅंड्राईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप काम करते.
उमंग वेब, आयव्हीआर आणि एसएमएस सारख्या माध्यमातूनही तुम्ही हे अॅप डाऊनलोड करु शकता. स्मार्टफोनसह टॅबलेट आणि लॅपटॉपवरही हे अॅप डाऊनलोड करु शकता.
9718397183 वर मिस्ड कॉल देऊनही तुम्हाला अॅप डाऊनलोड करता येईल.
डाऊनलोड केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरशी याचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
अधिक माहिती साठी या site ला भेट द्या
https://web.umang.gov.in
अधिक माहिती साठी या site ला भेट द्या
https://web.umang.gov.in
COMMENTS