OrdinaryITPostAd

आधार' कुठे वापरलं गेलंय?

तुमचं 'आधार' कुठे वापरलं गेलंय?


इन्कम टॅक्स रेकॉर्डपासून ते बँक अकौंट, विमा पॉलिसी, गुंतवणुकीचे रेकॉर्ड, प्रॉव्हिडंट फंड आणि पेंशन अकौंटसहीत सर्वच गोष्टींसाठी देशात आधारच वापर वेगाने वाढत आहे. अशात अनेकांना आपलं 'आधार' कुठं वापरलं गेलंय हे माहिती नसतं. यासाठी काय करायचं? त्याबाबत आज जाणून घेऊयात...

* https://uidai.gov.in/en या लिंकवर जाऊन आधार ऑथेंटिफिकेशन हिस्ट्रीवर क्लिक करा. ही आधार सर्व्हिसेस टॅबमध्ये उपलब्ध आहे. 

* यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर स्क्रिनवर एक सिक्युरिटी कोड असतो. तो टाका. नंतर तुम्ही Genrate OTP या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो. 

* इथे ग्राहकांना ऑथेंटिफिकेशनच्या प्रकारानुसार पर्याय निवडण्याची गरज आहे. जर कुणाला सर्वच आकडे बघायचे असेल तर ऑल पर्याय निवडू शकता. त्यानंतर गेल्या सहा महिन्यातीलही आकडे पाहू शकता.

* मात्र आधारचा वापर कुठे केला याची हिस्ट्री बघण्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकणे गरजेचे आहे.

* एकदा ऑथेंटिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला दिवस, वेळ, ट्रान्झॅक्शन आयडी आणि ऑथेंटिफिकेशन यशस्वी झाले की नाही? अशी माहिती मिळते. 

* या सेवेचा उपयोग करण्यासाठी मोबाईल नंबर आधारशी रजिस्टर्ड असला पाहिजे. याचा आधारच्या रेकॉर्डशी व्हेरिफिकेशन झालेले असले पाहिजे.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम