ब्लॉग कसा तयार करावा ? गुगलचे ब्लॉगर डॉट कॉम(com) हे संकेतस्थळ तुम्हाला विनामूल्य ब्लॉग तयार करण्याची सुविधा देते. या संकेतस्थळाला भेट...
ब्लॉग कसा तयार करावा ?
- गुगलचे ब्लॉगर डॉट कॉम(com) हे संकेतस्थळ तुम्हाला विनामूल्य ब्लॉग तयार करण्याची सुविधा देते.
- या संकेतस्थळाला भेट देऊन तुमच्या गुगल अकाऊंट अर्थात जीमेलच्या लॉगइन नावाने साइन इन करा.
- तुम्ही ‘लॉगइन’ करताच समोर दिसणाऱ्या डॅशबोर्डवर तुमचे ब्लॉग किंवा त्याला भेट देणाऱ्यांची संख्या अशी माहिती दिसेल.
- www.aapalathakare.blogspot.in
- नवा ब्लॉग लिहिण्यासाठी ‘न्यू ब्लॉग’वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर टायटल आणि अॅड्रेससाठी विचारणा होईल.
- ‘Title’ म्हणजे तुमच्या ब्लॉगचे नाव आणि तुमच्या ब्लॉगचा पत्ता (internet address) जो कायमस्वरूपी असेल. तो तुम्हाला बदलता येणार नाही. तुम्ही शीर्षक व पत्ता तुम्ही ज्या विषयावर लिहिणार असाल त्यानुसार निवड करून तेथे नोंदवा. तुमचा ब्लॉग तयार झाला आहे.
- आता या ब्लॉगवर नवीन लेख लिहण्याकरिता New Post क्लिक करा त्यानंतर एक नवीन पान उघडेल जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग लिहू शकाल .
- या पेजवर पहिल्या भागात Post Title दिसेल जे तुमच्या ब्लॉगचे अर्थातच लेखाचे नाव असणार आहे. दुसऱ्या भागात blog formatting ¨FZ tools दिसतील. जिथे तुम्हाला टायपिंग करून लेख लिहिता येईल.
- ब्लॉग लिहीत असताना लिखाण पूर्ण झालेले नसेल तर ” Save” वर क्लिक करून ते सुरक्षित ठेवता येईल. एखादा विषयानुरूप फोटो जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो. तो फोटोही तुम्हाला इथे जोडता येतो.
- तसेच ब्लॉग पब्लिश करण्यापूर्वी तो वाचकांना कसा दिसेल हे पडताळून बघण्याकरिता Preview वर क्लिक करा आणि ब्लॉग पूर्ण लिहून झाल्यावर ” Publish” या बटणवर क्लिक करून प्रसिद्ध करा.
ब्लॉगलेखनाचे फायदे
- कोणत्याही विषयावर व्यक्त होता येतं.
- लेखन, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉग करता येतो.
- तुमचे लेखन केवळ देशातच नव्हे तर जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवता येते.
लक्षात ठेवा
तुम्ही लिहिलेल्या ब्लॉगवरील मतांशी प्रत्येक जण सहमत असेलच असे नाही. यातील काही जण ब्लॉगच्या खालील प्रतिक्रिया जागेत तुमच्या मतांविरुद्धची मते नोंदवू शकतात. मात्र, याबद्दल चिडून अथवा निराश होऊन प्रत्युत्तर करणे योग्य नाही. ब्लॉगवर नोंदवण्यात येणाऱ्या प्रतिक्रियांकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. तुमच्या ब्लॉगवर मतप्रदर्शन करणं, हा ब्लॉगवाचकांचा हक्क आहे. त्यांच्या मताचा आदर ठेवा.
मराठी टायपिंग
ब्लॉग मराठीत टाइप करण्याकरिता गुगलचीच मदत घ्या. http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ या वेबसाइटला भेट द्या. इथे इंग्लिशमध्ये टाइप करा ते मराठीत दिसेल. ते कॉपी करून ब्लॉगमध्ये पेस्ट करा
COMMENTS