मोबाइलच्या कॅमेऱ्यातून एखाद्या मजकुराचा फोटो काढून तो टेक्स्टमध्ये सहज मिळवू तुम्ही आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यातून एखाद्या मजकुराचा फ...
मोबाइलच्या कॅमेऱ्यातून एखाद्या मजकुराचा फोटो काढून तो टेक्स्टमध्ये सहज मिळवू
तुम्ही आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यातून एखाद्या मजकुराचा फोटो काढून तो टेक्स्टमध्ये सहज मिळवू शकता.
मात्र, यासाठी तुम्हाला अँड्रॉइड प्ले स्टोअरवर उपलब्ध अॅपची मदत घ्यावी लागते.
अशा प्रकारची सुविधा देणारे अनेक अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
मात्र. यापैकी टेक्स्ट फेअरी -ओसीआर टेक्स्ट स्कॅनर (Text Fairy (OCR Text Scanner) हे चांगले अॅप आहे.
App डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
या अॅपच्या मदतीने तुम्ही मजकुराचा फोटो काढून अर्थात स्कॅन करून त्याचे टेक्स्टमध्ये रूपांतर करू शकता.
यामध्ये उपलब्ध झालेला मजकूर एडिट अर्थात संपादित करण्याची सुविधाही आहे.
अशा प्रकारच्या अॅपमधून केलेला सर्वच मजकूर अचूक असेल असे नाही.
मात्र, इंग्रजी भाषेतील मजकुराच्या बाबतीत चुकांची शक्यता कमी आहे.
तरीही कन्व्हर्ट झालेला मजकूर पडताळून पाहण्यास विसरू नका.
COMMENTS