रोमन संख्यांमध्ये 1, 10, 100 या संख्यांसाठीच्या खुणा लागोपाठ तीनदा येउ शकतात, म्हणजे त्या खुणेच्या तिपटीपर्यंतच्या संख्या त्या खुणेच्या वापरातून लिहिता येतात. उदा. 3 = III, 30 = XXX, 300 = CCC .
1, 10, 100 या संख्यांसाठीच्या खुणांची चौपट लिहायची असल्यास त्याखुणेपुढे सारणीतील पुढील खुण येते. उदा. 4 = IV, 40 = XL, 400 = CD.
5, 50, 500 या संख्यांच्या खुणा लागोपाठ दोनदा येउ शकत नाहीत.
अधिक मोठ्या संख्या
2145 = (2 × 1000) + (1 × 100) + 40 + 5 = MMCXLV
890 = (500 × 1) + (3 × 100) + 90 = DCCCXC
465 = 400 + 50 + 10 + 5 = CDLXV
120 = 100 + (2 × 10) = CXX
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url