पायाभुत चाचणीचे गुण भरणे आणि शिक्षक Assign करणे
पायाभुत चाचणी चे गुण भरणे
सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या Mahastudent App ची लिंक खाली दिली आहे.
सदरचे App गूगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येते.
App डाउनलोड झाल्यानंतर डाव्या कोपऱ्यात तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक केल्यावर Mahastudent App च्या वापराबाबतचे मैंन्यूअल सुद्धा वाचायला मिळेल.
**** विद्यार्थ्यांचे गुण ****
➡ Maha student App वरून आणि
➡ student पोर्टल मुख्याध्यापक लॉगिन वरूनसुद्धा भरता येतील.
(वरील दोन्ही पद्धतीने गुण भरता येतील )
हे App इन्स्टॉल केल्यानंतर
➡ शाळेचा UDISE नंबर टाकावा.
➡ सरल पोर्टलसाठी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकावा.
➡ नंतर पासवर्ड सेट करावा.नंतर हे app सुरू होईल.
जर वर्ग शिक्षक Assign केले नसतील तर App डाउनलोड करून सुद्धा App रजिस्टर करता येणार नाही.
**** शिक्षक Assign कसे करावेत ****
त्यासाठी student पोर्टल लॉगिन करा.
लॉगिन केल्यावर आडव्या बार मधील Master टैब मधील
Create Teacher User
या सबटैबवर क्लिक करा.
खालील चौकटीत शिक्षकांची नावे दिसतील त्यामधील शेवटच्या रकान्यात Update/ Delete वर क्लिक करा.
त्या शिक्षकाचे नाव वरील चौकटीत आलेले दिसेल.
1) जर आपल्या शाळेतून शिक्षक बदलून गेले असल्यास Delete वर क्लिक करा
2) जर शिक्षक बदलून गेले नसल्यास विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा
मोबाईल नंबर अचूक टाका कारण याच मोबाइल नंबरवर mahastudent App चा OTP येणार आहे.
सर्व माहिती भरल्यानंतर
Update वर क्लिक करा.
याप्रमाणे सर्व शिक्षक अपडेट करा.
आता Update केलेले शाळेतील शिक्षक
वर्गशिक्षक म्हणून नेमण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
➡ आडव्या बार मधील Maintenance टैबवर क्लिक करा.
➡ Assign Class Teacher. वर क्लिक करा
आपल्या शाळेतील शिक्षकांची नावे दिसतील जर वर्गनिहाय शिक्षक बदलायचे असतील तर
➡ पहिल्या चौकटीत दिसणाऱ्या शिक्षकांच्या नावासमोरील वर्गावर (Standard) क्लिक करा.
➡ क्लिक केल्यावर वरील चौकटीत शिक्षकाचे नाव आलेले दिसेल
➡ नावाखाली Remove आणि Reset
हे दोन ऑफ़शन दिसतील
त्यातील Remove या ऑफ़शन वर क्लिक करा.
वर्गशिक्षक Remove होतील.
आता त्या वर्गासाठी नवीन वर्ग शिक्षक नेमण्यासाठी
वरील चौकटीत
➡ standard सिलेक्ट करा.
➡ Stream व Division निवडा.
➡ वर्गासाठी शिक्षकाचे नाव निवडा.
➡ Assign वर क्लिक करा
खालील चौकटीत नवीन वर्ग शिक्षकांचे नाव Add झालेले दिसेल.
याप्रमाणे सर्व वर्गांना शिक्षक नेमावेत. त्यानंतरच संबंधित शिक्षकांना App डाउनलोड केल्यावर आपला वर्ग व वर्गातील मुलांची यादी आपल्या मोबाईलवर उपलब्ध होईल.
App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Nice sir
उत्तर द्याहटवाthanks sir ji
हटवाउपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाthanks sir ji
हटवा