पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी फाईल डाउनलोड का होत नाही?
➡ Student portal वर पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी फाईल डाउनलोड का होत नाही?
कारण आपण Division Update केलेल्या नाहीत म्हणून.
➡ सर्व वर्गाच्या Division Update केल्यावर Excel tab मधील Download Question-wise वर क्लिक करा आता तुम्हाला division select करता येईल.
🔵 Division Update कशा पद्धतीने कराव्यात?
➡ आपल्या शाळेचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून Student portal वर लॉगिन करा.
➡ त्यानंतर वर दिसणाऱ्या आडव्या टॅब मधील Master मधील Division ला क्लिक करा.
➡ आता Standard मधील आपल्या शाळेतील एक वर्ग निवडा.
➡ आता खाली त्या वर्गाच्या सर्व Division दिसतील. त्यामधील A नावाची किंवा 1 Division Name असेल त्यावर क्लिक करा.
➡ क्लिक केल्यावर त्या Division ची माहिती वरच्या सर्व रकान्यात दिसेल. त्याखाली Update व Reset बटण दिसते त्यामधील Update बटणावर क्लिक केले की सर्वात वर Division Updated Successfully असा मेसेज दिसेल त्यामधील OK वर क्लिक करा.
➡ अशा पद्धतीने सर्व वर्गाच्या सर्व Division Update करून घ्या आणि Excel मधून फाईल डाउनलोड करून आपल्या वर्गाचे/शाळेचे पायाभूत चाचणीचे गुण भरून टाका.
COMMENTS