सत्र२०१८-१९ साठी प्रचलित नविन मुल्यमापन पद्धती : इयत्ता नववी व दहावी साठी
सत्र२०१८-१९ साठी प्रचलित नविन मुल्यमापन पद्धती : इयत्ता नववी व दहावी साठी
नमस्कार मित्रांनो
अनेक वॉट्स अॅप गटांतुन इयत्ता ९ व १० च्या मूल्यमापन संदर्भात विविध संदेश व तक्ते दिल्या जात आहेत.
या पैकी अनेक तक्ते व संदेश हे माध्यमिक विभागाच्या म्हणजे इयत्ता ९ते१० च्या संदर्भात सत्र २०१८-१९ ला लागु नाहीत.
अनेक शारीरिक शिक्षकांच्या विनंतीवरून सत्र २०१८-१९ साठी इयत्ता ९ते१० साठी लागु असलेली मूल्यमापन पद्धती ची माहिती देण्याचा येथे प्रयत्न करीत आहे.
कृपया सदर माहिती शेवटी दिलेल्या संदर्भा नुसार तपासुन पहावी व शासन निर्णयानुसार आपल्या मुल्यमापन नोंदी योग्य कराव्यात ही अपेक्षा.
इयत्ता ९ते१० साठी आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाचे मूल्यमापन पद्धती
आरोग्य व शारीरिक शिक्षण हा शालेय श्रेणी चा अनिवार्य विषय आहे.
या विषयासाठी प्रथम सत्र व द्वितीय सत्रात स्वतंत्रपणे प्रत्येकी १०० गुणांचे मूल्यमापन करावे.
प्रचलित अभ्यासक्रमानुसार आपण शिकविलेल्या घटकांचे अनुशंगाने भारांश ठरवुन मूल्यमापन करण्याच्या क्षमता शारीरिक शिक्षकांनी निश्चित कराव्यात.
प्रात्यक्षिक परीक्षे चे घटक ठरवित असतांना विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढता मूल्यमापनावर विशेष भर देण्यात यावा.
कोणत्याही स्वरूपाची लेखी प्रश्न पत्रिका देवुन लेखी उत्तर पत्रिका सोडवून घेवु नये.
आपण आपल्या स्तरावर निश्चीत केलेल्या क्षमतां नुसार प्रात्यक्षिक परीक्षा व मैदानी खेळातील क्रीडा कौशल्याचे सुयोग्य मुल्यमापन करावे.
इयत्ता नववी व दहावी च्या आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाच्या प्रथम व द्वितीय सत्राचे मूल्यमापन प्रत्येकी १०० गुणांचे आहे. दोन्ही सत्रात प्रत्येकी ५० गुण स्वतंत्रपणे लेखन कार्यासाठी देण्यात आले असून प्रथम व द्वितीयसत्रात स्वतंत्रपणे प्रत्येकी ५० गुण प्रात्यक्षिक स्वरूपातील मूल्यमापनावर आधारीत आहेत.
लेखन कार्यासाठी गुणांकन
वरिल प्रत्येक सत्रात लेखन कार्यासाठी दिलेले ५० गुण हे अभ्यासक्रमातील विविध घटक उपक्रमाचे तात्विक भागाचे लेखनासाठी दिलेले आहेत. म्हणजे उपक्रम व घटक शिकवतांनाच वा शिकवल्यावर त्या बाबत च्या विद्यार्थ्यांना दिलेल्या नोंदी, माहिती, तंत्र वा संदर्भ यांचे सहाय्याने त्यांनी सदर उपक्रम व घटकांचे तात्विक भागाचे लेखन करणे अपेक्षित आहे. सदर लेखन पद्धती शारीरिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजवून द्यावी व स्वाध्याय, गृहपाठ, गृहकार्य, प्रकल्प या पद्धतीचा अवलंब करीत अभ्यासक्रमातील घटकांनुसार तात्विक भागाचे लेखन करण्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
लेखन वही, नोंदवही, चिकटवही, प्रकल्प, तक्ता, संगणकीय पीपीटी सादरीकरण, कथामय व्हिडीओ सादरीकरण आदी विविध पद्धती ने विद्यार्थी त्याने संपादित केलेल्या आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाच्या घटका चे लेखन कार्य पुर्ण करु शकतो. वरील पैकी एका वा अनेकविध पद्धतीचा उपयोग करुनही विद्यार्थी जर लेखन कार्य करीत असेल तरी चालेल. त्यावरुन त्याला सदर घटकांचे आकलन किती व कसे झाले आहे ते पाहुन गुणांकन करणे अपेक्षित आहे.
सर्वांची एकसारखी एकच प्रकारची वही असेलच असे नव्हे. शिक्षकांनाही असा आग्रह न धरता विद्यार्थ्यांना त्याच्या कल्पकतेने आपली संपादणुक आपल्या शब्दात लेखन करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
याच लेखन केलेल्या भागाचे ५० गुण प्रथम सत्रात व ५० गुण द्वितीय सत्रात स्वतंत्रपणे नोंदवायचे आहेत.
प्रात्यक्षिक उपक्रम परीक्षा
प्रथम व द्वितीय सत्रात प्रत्येकी ५० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतांना आपण आपल्या शाळेत शिकविलेल्या उपक्रम, घटक व क्रीडा कौशल्यांचे योग्य मुल्यमापन करण्यात यावे.
प्रात्यक्षिकांचे मूल्यमापन करतांना कृती मूल्यमापन करायचे आहे हे शारीरिक शिक्षकांनी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे धावण्याच्या कौशल्याचे मूल्यमापनावर करावयाचे असेल तर किती कमी वेळात अंतर कापले याचा विचार न करता धावण्याच्या कौशल्यांचा योग्य पद्धतीने उपयोजन केले काय ते पाहुनच गुणांकन करायचे आहे.
ज्या क्षमतांचे मूल्यमापन करण्याचे निश्चीत केलेले आहे त्या संबंधित कौशल्यांचे परिक्षण करून गुणांकन करावे. अभ्यासक्रमातील घटक निहाय
शारीरिक सुदृढता, क्रीडा कौशल्य, योग, प्राणायाम, आदी व इतर बाबी प्रात्यक्षिक मूल्यमापनासाठी शिक्षकांनी भारांश निश्चीती करावी.
इयत्ता ९ते१० साठी आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाचा प्रथमसत्र गुणदान तक्ता
१. अनुक्रमांक
२. विद्यार्थ्यांचे नाव
३. लेखन कार्य ५० पैकी गुण
४ प्रात्यक्षिक परीक्षा/मैदानी खेळ ५० पैकी गुण
५. एकुण गुण प्रथमसत्र १०० पैकी गुण
६. श्रेणी
इयत्ता ९ते१० साठी आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाचा द्वितीय सत्र गुणदान तक्ता
१. अनुक्रमांक
२. विद्यार्थ्यांचे नाव
३. लेखन कार्य ५० पैकी गुण
४ प्रात्यक्षिक परीक्षा/मैदानी खेळ ५० पैकी गुण
५. एकुण गुण द्वितीयसत्र १०० पैकी गुण
६. प्रथम सत्र १०० पैकी गुण
७. प्रथमसत्र गुण +द्वितीयसत्र गुण एकुण २०० पैकी गुण
८. २००/ २ सरासरी गुण
८. श्रेणी (सरासरी गुणांनुसार)
श्रेणी, गुणांकन व टक्केवारी
अ श्रेणी: ६०=< गुण
६० टक्के व त्यापेक्षा जास्त अ श्रेणी
ब श्रेणी: ४५ - ५९ गुण
४५ ते ५९ टक्के
क श्रेणी: ३५ -४४ गुण
३५ ते ४४ टक्के
ड श्रेणी: ३४=>
३४ टक्के व त्या पेक्षा कमी (अनुत्तीर्ण)
संदर्भ:
मुल्यमापन आराखडा
इयत्ता नववी व दहावी
(भाषा माध्यम व शालेय श्रेणी विषय)
प्रकाशन २०१८
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ( बालभारती) द्वारे प्रकाशित
सर्व विभागीय शिक्षण मंडळाचे पुस्तक विक्री केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध
बालभारतीच्या सर्व विभागीय केंद्रांवर विक्रीसाठी उपलब्ध
COMMENTS