⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहावीच्या बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेलं परीक्षेचं स्वरुप

दहावीच्या विद्यार्थ्यांनो गोंधळून जाऊ नका, इकडे लक्ष द्या...


बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेलं परीक्षेचं स्वरुप यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था 
तुमचा पाल्य किंवा विद्यार्थी यंदा दहावीला असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती ... मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दहावीची परीक्षा सुरू होईल. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ही पहिलीच परीक्षा असेल. मात्र त्यामुळेच दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येतेय. विज्ञान आणि गणित विषयाची सर्वाधिक काळजी विद्यार्थ्यांना आहे. यंदा नववीच्या अभ्यासक्रमातले प्रश्न येणार आहेत. तसंच पाठपुस्तकाबाहेरचेही ४ गुणांसाठी प्रश्न येणारेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी तोंडी परीक्षा घेण्यात येणार नाही. म्हणजे शंभर गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. 
बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेलं परीक्षेचं स्वरुप यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालीय. बदललेल्या अभ्यासक्रमामुळे निकालावरही परिणाम होण्याची शक्यता आहेच.
या बदललेल्या नियमांची माहिती पालकांनाही देण्याचं काम काही शाळा वेगवेगळ्या कार्यशाळांमधून पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही देण्यात येते आहे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यास हा बदललेला अभ्यासक्रम असल्याचं सांगत त्यांनी या बदलाचं स्वागतच केलंय. कोणताही संभ्रम निर्माण न करता शाळांमधून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन विद्यार्थ्यांनी करावे .



ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम