एमएचटी-सीईटी’चे वेळापत्रक जाहीर
⦓ एमएचटी-सीईटी ⦔
⦓ वेळापत्रक ⦔
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी “एमएचटी-सीईटी’चे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार या सीईटीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, त्यासाठी
अंतिम मुदत 23 मार्चपर्यंत आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत “एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेसाठी प्रथमत: अर्ज करणे आवश्यक आहे. सीईटीसाठी अर्ज करण्यास दि. 1 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर लिंक खुली करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही परीक्षा पहिल्यादांच ऑनलाईन पद्धतीने होत आहे.
“एमएचटी-सीईटी’ची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असेल, अर्ज कसे भरावे, गुणांचा तपशील, सीईटी कोण पात्र असतील, परीक्षेची वेळ, याची सविस्तर माहिती https://mhtcet2019.mahaonline.gov.in
“एमएचटी-सीईटी’चे वेळापत्रक"
* अर्ज करण्याची मुदत : 1 जानेवारी ते 23 मार्च*
* विलंब शुल्कासह अर्जाची मुदत : 24 मार्च ते 31 मार्च *
* शुल्क भरण्याची मुदत : 3 एप्रिल*
* हॉल तिकिट उपलब्ध : 25 एप्रिल ते 2 मे *
* “एमएचटी-सीईटी’ परीक्षा : 2 मे 13 मे*
COMMENTS