अविरत 2 प्रमाणपत्रासाठी प्रोफाइल अपडेट करणे
** अविरत 2 **
प्रमाणपत्रासाठी प्रोफाइल अपडेट करणेबाबत...
अविरत 2 टप्पा पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना लवकरच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी 5 एप्रिल पूर्वी आपली माहिती अद्ययावत करावे. योग्य माहिती न दिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल.
प्रोफाइल अपडेट करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
प्ले स्टोअर मध्ये जाऊन अविरत 2 उघडा आणि ऍप अपडेट करा.
आता अविरत 2 ऍप उघडून लॉग इन व्हा.
App डाऊनलोड करण्यासाठी खालील iconवर क्लिक करा .
सूचना स्क्रीन दिसेल. "ठीक आहे" वर क्लिक करा.
खालील बाजूस "पहिल्या टप्याचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता" हा पर्याय दिसतो. तुम्हाला जर टप्पा 1 चे इ-प्रमाणपत्र हवे असल्यास इथून डाउनलोड करून घ्या.
तिथेच वर तुम्हाला दुसरा टप्पा हिरवा झालेला दिसेल. त्यावर क्लिक करा.
आता डाव्या कोपऱ्यातील तीन आडव्या रेषेवर क्लिक करा. डाऊन मेनू उघडेल. त्यातील प्रोफाइल वर क्लिक करा. प्रोफाइल उघडेल.
त्यातील पृथ्वी गोल चिन्हासमोरील मराठी माहिती फॉर्म वर क्लिक करा. फॉर्म उघडेल.
"मराठी माहिती फॉर्म" मधील माहिती वाचून बघा. नाव, शुद्धलेखन तपासा. दुरुस्ती नसल्यास मागे जा.
दुरुस्ती असल्यास "पेन्सिल" चिन्हावर क्लीक करा आणि आवश्यक ती माहिती दुरुस्त करून घ्या.
प्रोफाइल माहिती भरून झाल्यावर वरच्या बाजूच्या बॅक चिन्हावर क्लिक करा. पुन्हा एकदा बॅक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य मेनुवर याल.
इथून आता लॉग आऊट व्हा.
COMMENTS