नको असलेले ईमेल होणार ऑटोमॅटीक डिलीट कसं ते जाणून घ्या.
नको असलेले ईमेल होणार ऑटोमॅटीक डिलीट
कसं ते जाणून घ्या.
बहुतांश वेळा ईमेल इनबॉक्समधील नको असलेल्या ईमेल्सची संख्या ही वाढत असते. अशाप्रकाचे प्रमोशनल ईमेल डिलीट केले नाहीत तर इनबॉक्स पूर्ण भरून जातो. आता नको असलेले ईमेल ऑटोमॅटीक डिलीट करता येतात. ते कसे डिलीट करायचं हे जाणून घेऊया.
▪ सर्वप्रथम emailstidio.pro वरून जीमेल अकाऊंटमध्ये 'Email Studio' हे इन्स्टॉल करा.
▪ इन्स्टॉल झाल्यानंतर जीमेल अकाउंटमध्ये जाऊन इनबॉक्समधील कोणताही एक मेसेज ओपन करा.
▪ तेथे देण्यात आलेल्या ईमेल स्टुडिओ आयकॉनवर क्लिक करा.
▪ आपल्या जीमेल आयडी आणि पासवर्डवरून लॉग इन करा.
▪ लॉग इन केल्यानंतर लिस्टमध्ये देण्यात आलेल्या 'ईमेल क्लीनअप' पर्यायावर टॅप करा.
▪ जीमेलमध्ये जो टास्क करायचा आहे त्यासाठी अॅड न्यू रूलवर क्लिक करा.
▪ येथे नवीन नियमाप्रमाणे एखाद्या खास ईमेल आयडीला मार्क करू शकता.
▪ या प्रोसेसने जीमेलला एखाद्या खास ईमेल आयडीवरून एका महिन्यात आलेले सर्व ईमेल्स डिलीट करण्याची कमांड देता येते.
▪ ही प्रोसेस झाल्यावर सेव्ह बटणावर क्लिक करा. त्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये ईमेल स्टुडिओ लाँच होईल.
▪ जीमेल युजर्सने सेट केलेले नियम लागू करतं. त्यानुसार निवडण्यात आलेल्या ईमेल अॅड्रेस वरून येणारे मेसेज ऑटोमॅटीक डिलीट करतं.
COMMENTS