⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

School portal वरील सूचना.

School portal वरील सूचना.


१) सन २०१९-२० च्या संच मान्यतेसाठी स्कुल पोर्टल वरील माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 २.) शाळांना दरवर्षी स्कुल पोर्टलवरील सर्व माहिती भरून अपडेट करून finalize करावी लागते. यावर्षी मात्र केवळ ज्या माहितीमध्ये शाळांना बदल करावयाचा आहे त्याच माहिती मध्ये बदल करण्याची कार्यपद्धती खालील प्रमाणे राहील.


३. मुख्याध्यापक यांनी स्कुल पोर्टलला लॉगिन केल्यानंतर स्क्रीन स्टेटस फॉर्म दिसेल. सदर फॉर्म च्या शेवटी check last data या बॉक्सवर क्लिक करावे. त्यानंतर आपणास मागील वर्षी स्कुल मध्ये भरलेली सर्व माहिती पाहावयास मिळेल. सदर माहिती प्रथम तपासून घ्यावी. माहिती तपासल्यानंतर I have read all information ही सूचना दिसेल त्यावर क्लिक करून submit या बटणावर क्लिक करावे.


 ४). आपणास पुन्हा screen status form दिसेल. सदर फॉर्मवर स्कुल पोर्टलवरील आवश्यक माहितीचे titles दिसतील. ज्या titles मध्ये शाळेस दुरुस्ती /बदल करावयाचे आहे केवळ तेवढ्याच titles च्या check box वर क्लिक करावे व form च्या शेवटी असलेल्या submit वर क्लिक करावे.


 ५.) आपणास सर्व स्क्रीन्स दिसतील त्यापैकी ज्या titles च्या check box वर यापूर्वी बदल करण्यासाठी क्लिक केलेले आहे तेवढ्याच स्क्रीनमध्ये आपणास बदल करता येईल. आपण सदर स्क्रीनवरील माहितीमध्ये बदल करून अपडेट करून finalize करावी.

 ६.) ज्या स्क्रीन मध्ये आपणास बदल अपेक्षित नाही त्या स्क्रीन मागील वर्षीच्या माहितीसह finalize स्टेटस मध्ये असतील.

 ७.) वर नमूद केलेल्या सुविधांशिवाय माध्यम बदल, शाळेचा प्रकार, शाळेची शिफ्ट, इ. बाबत शिक्षणाधिकारी यांचे लॉगिनवर उपलब्ध आहेत. वर नमूद केलेली कार्यवाही संच मान्यतेसाठी आवश्यक असल्याने  शाळांनी पूर्ण कराणे गरजेचे आहे...

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम