स्वच्छतेची शपथ आणि साजरे करणारे उपक्रम
स्वच्छतेची शपथ
स्वच्छता ही सेवा उपक्रमाबाबत ....
आपल्या अधिनस्त सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक , वरिष्ठ महाविदयालयांना दि .१ , २ व ३ ऑक्टोबर २०१९ रोजी वरील विषयान्वये विविध उपक्रमांचे आयोजन करावे व त्याचा अहवाल निवडक फोटोसह न चुकता त्याच दिवशी दु .१ .०० वा पर्यंत पाठवावा .
अ) १ ऑक्टो .२०१९
१ ) सर्व शाळा . महाविद्यालये स्वच्छता विषयक प्रतिज्ञा घेणे
२ ) पर्यावरण संरक्षण - प्लॅस्टिकमुक्तीसाठी मानवी साखळी
३ ) सेल्फी पॉईंट उभारणी
४ ) प्लॅस्टिक संकलन नियोजन आराखडा तयार करणे
५ ) प्लॅस्टिकमुक्ती / पर्यावरण संरक्षण -जनजागृतीसाठी पालकांना विदयार्थी मार्फत पत्र देणे
ब ) २ ऑक्टोबर २०१९
१ ) प्लॅस्टिक मुक्ती / स्वच्छता रॅली आयोजन
२ ) स्वच्छता विषयक प्रतिज्ञा
३ ) वरील विषयांना अनुसरून निबंध , पत्र लेखन , चित्र , रांगोळी स्पर्धाचे आयोजन
४ ) चित्ररथ काढणे , पथनाटय , बाहुलीनाट्याचे आयोजन
५ ) आदिवासी बहुल शाळांमध्ये स्थानिक ईको फ्रेंडली साहित्याचे प्रदर्शन , माहिती
क) ३ ऑक्टो .२०१९
१ ) विद्यार्थ्याना आपल्या घरातील प्लैस्टिक कचरा _ जसे विविध प्रकारच्या बाटल्या , पिशव्या गोळा करून शाळेत जमा करणे , त्या मोबदल्यात त्यांना प्रोत्साह नपर कापडी पिशव्यांचे वाटप करणे
i ) किती किलो प्लॅस्टिक कचरा जमा केला त्याच्या शाळा , विदयार्थीनिहाय नोंदी करणे
ii ) कचरा संकलन करणे
२ ) स्थानिक नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग घेणे
याप्रमाणे स्थानिक परिस्थितीनुरूप उपक्रम घ्यावेत .
१०० % सर्व शाळा महाविदयालयांचा सहभाग घ्यावा .
याशिवाय
NGO ची मदत
नवरात्र उत्सवात स्वच्छता जनजागृती प्रबोधन करता येईल .
COMMENTS