व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,महाराष्ट्र शासन अंतर्गत बालभारती व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण),पुणे यांच्या समन्वयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या,अनुदानित,उच्च प्राथमिक ,माध्यमिक ७२५ शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प राबविला जाणार आहे.
सदर प्रकल्पात सहभागी होण्यासाठी शाळा दि. 10 ऑक्टोबर 2019,रोजी 23:55 पर्यंत
वरील बटनावर क्लिक करून अर्ज करू शकतात.
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी शाळांनी खलील किमान अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१) शाळेमध्ये बसविण्यात येणाऱ्या व्हर्च्युअल क्लासरूम साधनांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे आवश्यक
२) राज्यस्तरावरून व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे प्रक्षेपित होणाऱ्या तासिकांचे, प्रशिक्षणवर्गांचे शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी,शिक्षकांसाठी प्रक्षेपण करणे गरजेचे.
३) व्हर्च्युअल क्लासरूमची साधने,TV बसविण्यासाठी सुस्थितीतील व उत्तम बैठकव्यवस्था असलेली वर्गखोली/ हॉ ल आवश्यक
४) सदर शाळेचे मागील १२ महिन्यांचे वीजबिल पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक.
५) शाळेची किमान पटसंख्या १०० असणे आवश्यक.
सदर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या शाळांमधून प्रति तालुका किमान २ शाळा निवडणे प्रस्तावित आहे.सदर प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या शाळांना याविषयी कळविले जाईल.सदर प्रकल्पासाठी शाळांची निवड करण्याचे पूर्ण अधिकार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे राहतील.
www.aapalathakare.blogspot.com
COMMENTS