जनगणना 2021
जनगणना 2021
- सन 2021 मध्ये देशात जनगणना केली जाणार आहे. 2021ची जनगणना ही 16 वी जनगणना असून ती स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे.
- 160 वर्षानंतर जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच अॅपमधून नागरिकांची माहिती गोळा केली जाणार आहे. जनगणनेसाठी तयार केल्या जाणाऱ्या अॅपमुळे राष्ट्रीय जननोंदणी अस्तित्वात येणार. अॅपमुळे व्यक्तीची माहिती तात्काळ अद्ययावत केली जाऊ शकते.
- ठळक वैशिष्ट्ये
- जनगणना 2021 मध्ये प्रथमच माहितीचे संकलन मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पाडली जाणार. प्रथम टप्प्यात घरांची गणना करण्यात येणार आणि दुसऱ्या टप्प्यात देशातल्या रहिवाशांची गणना केली जाणार.
- भारताची जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. घर-यादी आणि घर गणना एप्रिल ते सप्टेंबर 2020 या काळात करण्यात येणार आणि लोकसंख्येची गणना 9 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत होणार आहे.
- 16 भाषांमध्ये जनगणनेचे काम केले जाणार आहे. सुमारे 33 लक्ष गणक घराघरांमध्ये जाऊन लोकांची नोंदणी करणार.
- व्यय विषयक वित्त समितीने यासाठी 8754.23 कोटी रुपये खर्चाची शिफारस केली आहे.
- जनगणनेसाठी संदर्भ तारीख 1 मार्च 2021 असणार आहे. परंतू, जम्मू व काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यासारख्या प्रदेशांसाठी ही 1 ऑक्टोबर 2020 असणार.
COMMENTS