शालेय सहली बाबत महत्वाचे माहिती आणि कागदपत्रे शैक्षणिक सहल माहिती शैक्षणिक सहल नियमावली शैक्षणिक सहल परिपत्रक शैक्षणिक सहलीचे उद्दिष्ट शैक्षणिक सहलीचे महत्व शैक्षणिक सहल अहवाल सहलीचे महत्व मराठी निबंध शैक्षणिक सहल ठिकाण
सहली बाबत महत्वाचे
सहलीदरम्यान अपघातास प्राचार्य, शिक्षक जबाबदार
पुणे -शिक्षण उपसंचालक यांनी सहलींसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमांचे परिपत्रक जारी केले आहे. सहलींसाठी त्याचे पालन करणे प्रत्येक शाळेवर आता बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हेळसांड झाल्यास, त्यांना शारीरिक वा मानसिक त्रास झाल्याची तक्रार पालकांनी केली, तर त्यास जबाबदार शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
सहलींसाठी नियमावली
- समुद्र किनारे, अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या आदी ठिकाणी शैक्षणिक सहली काढू नयेत.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे.
- सहलीबरोबर प्रथमोपचार पेटी वा ज्या ठिकाणी सहल जाणार तेथील शासकीय रुग्णालये आणि डॉक्टरांचे संपर्क क्रमांक बरोबर असावेत.
- सहलीचा आराखडा पालकांपर्यंत पोचवावा. त्यांच्या सूचनांची दखल घ्यावी. गरज भासल्यास सहलीबरोबर पालकांचा एक प्रतिनिधी पाठवावा.
- सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सहलीच्या ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन शाळांनी विद्यार्थ्यांना केले पाहिजे.
- सहलींसाठी एसटी बस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या बस वापराव्यात.
- दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक सहलीबरोबर पाठवावा. सहलीला आलेल्या विद्यार्थिनींना एकटे वा नजरेआड फिरण्यास सोडू नये.
- शिक्षकांनी तंबाखू, गुटखा आणि अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये.
- सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत मोबाईल फोन वापरण्याची मुभा द्यावी. त्यांना पालकांच्या संपर्कात राहण्याची सूचना द्यावी.
- माध्यमिक विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, जलक्रीडा इत्यादीसाठी परवानगी देऊ नये.
- विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती कोणत्याही संस्थेने करू नये.
- शैक्षणिक सहलीसाठी जादा वर्गणी वा जादा शुल्क गोळा करू नये
- शैक्षणिक सहलीच्या मुक्कामाचा कालावधी हा एक मुक्कामापेक्षा अधिक काळ असू नये.
- राज्याबाहेर सहल काढण्यास शिक्षण विभागाकडून परवानगी मिळणार नाही.
- सहलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सहलीतील सर्व शिक्षकांची असेल.
- सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असेल, तर एक महिला शिक्षिका आणि एक महिला पालक प्रतिनिधी बरोबर नेणे बंधनकारक राहील.
- विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- सहलीत शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळेने निश्चित केलेला पालक प्रतिनिधी या शिवाय अन्य कुणीही बाहेरची व्यक्त घेऊ नये.
- प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सहली काढताना संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण प्रमुख, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. सहलीच्या सर्व बाबी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळवाव्यात.
- प्राथमिक शाळेच्या सहली या परिसर भेट वा संध्याकाळी परत घरी येतील, अशा स्वरूपाच्या असाव्यात. रात्रीच्या वेळी प्रवास करू नये.
- साहसी खेळ, वॉटर पार्क, ऍडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढू नयेत.
- रेल्वे क्रॉसिंगवरून बस नेताना शिक्षकांनी सावधगिरी बाळगावी, रेल्वेचे फाटक नसलेल्या ठिकाणी रेल्वे पुढे गेल्याची खात्री वा रेल्वे येत नसल्याची खात्री करूनच बस पुढे न्यावी.
- शाळेच्या शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थेचे संबंधित पदाधिकारी या सर्वांवर नियमानुसार गरज भासल्यास कायदेशीर कारवाई, शिस्तभंगाची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल.
- विद्यार्थ्यांची हेळसांड, कुचंबना झाल्यास मानसिक, शारीरिक त्रास झाल्यास त्याची पालकांकडून तक्रार आल्यास जबाबदार शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
- शाळांनी या सर्व सूचनांचे पालन केले आहे का, याची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी आणि तसेच त्यासंबंधी शंभर रुपयांच्या स्टॅंपवर हमीपत्र घेऊनच सहलींसाठी परवानगी द्यावी. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाईल.
सहल विषयी सर्व
सहल विद्यार्थी यादी
सहल पालक संमती पत्र
सहल परवानगी
सहल जमा खर्च
सहल अर्ज ST BUS
सहल GR
COMMENTS