शैक्षणिक तपासणी आणि शाळा भेट मार्गदर्शन PDF
राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्राकडे शालेय शिक्षणाच्या
दर्जाबाबत सादर केलेल्या अहवालाबाबत असमाधान व्यक्त करत केंद्रीय मनुष्यबळ विकास
मंत्रालयाने सरकारला पुन्हा शाळांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी
राज्यात पुन्हा एकदा शाळापडताळणी करावी लागणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व राज्यांचे मूल्यांकन करण्यासाठी
कार्यक्षमता प्रतवारी दर्शक तयार केले असून त्यामध्ये एकूण ७० निकष देण्यात आले
आहे. यासाठी भारत सरकारकडून युडायस, एनएएस, एमडीएम
हे पोर्टल आणि शाळा सिद्धी तसेच समग्र शिक्षा या माध्यमातून उपलब्ध माहितीचा उपयोग
करण्यात आला आहे. ही माहिती विविध राज्यातील शिक्षण विभागाच्यावतीने वेबसाइटवर
अपलोड करण्यात आली आहे.
मात्र महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागातील
अधिकाऱ्यांनी माहिती भरण्यात चालढकल केली असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळा तपासणीमध्येही
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाईही केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील
शिक्षणाचा दर्जा नेमका काय आहे हे समजून घेणे केंद्र सरकारला कठीण जात आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविण्यासाठी शाळांची पुन्हा तपासणी
करावी लागणार आहे.
COMMENTS