१० वी , १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘GOOD News.. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या...
१० वी, १२वीच्या
विद्यार्थ्यांसाठी ‘GOOD News..
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात
येणाऱ्या दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर “नापास” हा शेरा हटवून त्याऐवजी “कौशल्य विकासास पात्र”
असा शेरा यापुढे देण्यात येणार आहे.
दहावी, बारावी परीक्षेत नापास
होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्वत:च्या
पायावर उभे राहता यावं, यासाठी अशा विद्यार्थ्यांना
रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता
विभागाने घेतला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य
सेतू कार्यक्रम योजना राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
याआधी दहावी, बारावी परीक्षेत २
विषयांत नापास असेल तर एटीकेटीसाठी पात्र आणि ३ किंवा त्यापेक्षा जास्त विषयात
नापास असेल तर ‘नापास’ हा शेरा होता.
पण आता ३ किंवा अधिक विषयात नापास झाल्यास नापासऐवजी “कौशल्य
विकासास पात्र” असा शेरा मार्कशीटवर देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी – www.thenokari.com
Like us On Facebook https://www.facebook.com/thenokariDaily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी www.thenokari.com वर भेट द्यावी.Telegram Channel- https://t.me/thenokariInstagram - thenokari
I like your activity book for std.10.
उत्तर द्याहटवाThanks.....
हटवा