शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी तसेच त्यांना अध्ययन करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सर्व तपशील एकत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या २०१९-२०च्या संच मान्यतेला राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सरल पोर्टलवरील महिती अद्ययावत आणि पूर्ण करण्याच्या सूचना सर्व शाळा मुख्याध्यापक तसेच प्राचार्यांना संबंधित शिक्षणधिकाऱ्याकडून देण्यात आल्या आहेत.
२० जानेवारीपर्यंत मुदत,सरल पोर्टलवरील माहिती
अद्ययावत करा
शाळांमध्ये शिकणारे
विद्यार्थी तसेच त्यांना अध्ययन करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
यांचा सर्व तपशील एकत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या २०१९-२०च्या संच मान्यतेला
राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सरल पोर्टलवरील
महिती अद्ययावत आणि पूर्ण करण्याच्या सूचना सर्व शाळा मुख्याध्यापक तसेच
प्राचार्यांना संबंधित शिक्षणधिकाऱ्याकडून देण्यात आल्या आहेत.
सरल पोर्टलवरील माहितीपूर्ण कारण्यासाठी २० जानेवारी २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे.दिलेल्या मुदतीत
सरल पोर्टलवरील माहिती भरली न गेल्यास आणि संचमान्यता पूर्ण होण्यास अडथळे आल्यास
त्यासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य जबाबदार असतील असेही
परिपत्रकांद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.संचमान्यतेमध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांचा तपशील नोंदविण्यात येतो. यावरून कोणत्या शाळेत किती शिक्षक अतिरिक्त
होणार, तसेच कोणत्या शाळेत शिक्षक कमी आहेत याचा तपशील
सरकारला प्राप्त होतो. या माहितीच्या आधारे अतिरिक्त शिक्षकांचे कमी शिक्षक
असलेल्या शाळांमध्ये समायोजन केले जाते. आज राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त आहेत.
त्यांचे समायोजन होईपर्यंत शिक्षक भरतीवर बंदी आणण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात
काही विषयांसाठी भरतीची बंदी उठवली असली तरी कोणत्याही शाळेत शिक्षक हवे असल्यास
त्यांची संचमान्यता अद्ययावत आहे की नाही याचा विचार करून मगच मान्यता दिली जाते.
सन २०१५-१६पासून online संचमान्यता करण्यात आली आहे. मात्र
यात अनेक शाळांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी पुढील चार वर्षे तशाच
पुढे आणण्यात आल्या आहेत. या चुकांची दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढची
संचमान्यता करणे शक्य होणार नाही. परिणामी ही संचमान्यता स्थगित करण्यात आली होती
मात्र आता ही स्थगिती उठविली आहे.
अशी भरा माहिती
सर्व शाळा मुख्याध्यापक व प्राचार्यांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार २०१९-२० च्या संचमान्यतेसाठी सरल पोर्टलवरील टॅबमध्ये फॉरवर्ड फॉर संचमान्यता हे नवीन बटण सुरु करण्यात आले असून त्यात माहिती भरून संबंधितांनी ते केंद्रस्तरावर फॉरवर्ड करायचे आहे. ज्या शाळांतील विद्यार्थ्यांची बढती, बदली, विनंतीइयत्तेची नावे अशा प्रकारची कामे प्रलंबित आहेत, ती तात्काळपूर्ण करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. सर्वशिक्षक आणि शिक्षकेतर पदाबाबतची माहिती अद्ययावत असावी अशी स्पष्ट सूचनाही यातकरण्यात आली आहे.
COMMENTS