प्रजासत्ताक दिनाची खालिल प्रमाणे पूर्वतयारी करावी .... ध्वज निटनेटका व स्वच्छ असल्याची खात्री करा. ध्वज धुवून व इस्त्री करुन घ्या. नवीन ध्वज खरेदी करणे आवश्यक असल्यास,खरेदी करा.
सर्व शाळांनी 70 व्या प्रजासत्ताक दिनाची खालिल प्रमाणे पूर्वतयारी करावी ....
- ध्वज निटनेटका व स्वच्छ असल्याची खात्री करा.
- ध्वज धुवून व इस्त्री करुन घ्या.
- नवीन ध्वज खरेदी करणे आवश्यक असल्यास,खरेदी करा.
- ध्वजस्तंभ निटनेटका व सुरक्षित असल्याची खात्री करा.
- ध्वजस्तंभावर एक दिवस अगोदरच दोरी टाकून ठेवा.
- सर्व अपेक्षित मान्यवर तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील मा.आमदार,सभापती,उपसभापती,जिप.सदस्य,प.स.सदस्य,सरपंच,ग्रा.प.सदस्य,पोलिस पाटील,SMC यांना वेळीच निमंत्रित करा.
- ध्वजारोहण कुणाच्या हस्ते करायचे?या बाबत अगोदरच सर्वानुमते निर्णय घ्या.
- ध्वजगीत,व राष्ट्रगीताची तालासुरात योग्य तयारी करुन घ्या.
- प्रभातफेरीत द्यावयाच्या घोषणांची योग्य तयारी करुन घ्या.
- प्रभात फेरीचा मार्ग नक्की करा.
- प्रभात फेरीप्रसंगी शाळेत उपलब्ध असलेली वाद्ये वाजवा.
- सुत्रसंचलन कोण करणार ? हे अगोदरच ठरवा.
- ध्वज बांधण्याची व संचलनाची रंगीत तालिम अगोदरच करुन घ्या.
- आकर्षक फलक लेखन करा.
- ध्वजारोहनानंतर छोटेखानी कार्यक्रम घ्या.या कार्यक्रमातून शाळेने केलेले कार्य व भावी योजना उपस्थितांना सांगा.तसेच विद्यार्थ्यांच्या कला -गुणांना वाव देणे व तुमच्या प्रयत्नांचे सादरीकरण करा.
- अध्यक्ष चषक स्पर्धेत कोणत्याही स्तरावर विद्यार्थ्याना यश मिळाले असल्यास,त्यांनी मिळविलेली पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुन्हा एकदा करा.
- उपस्थित मान्यवरांचा यथायोग्य सन्मान करा.
- शाळेस विशेष सहकार्य व मदत देणाऱ्या व्यक्तिनाही कार्यक्रमास आमंत्रित करुन सन्मान करा.
- सर्व प्रकारची पूर्वतयारी २५ तारखेपूर्वीच करुन घ्या.
- दिनांक २२ जानेवारी २०२० च्या शासन परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेत ध्वजारोहनापूर्वी भारतीय संविधानामधील उद्देशिकेचे वाचन करावे.
- दिनांक २५ रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करावा.
- प्रत्येक शिक्षकावर कामाची जबाबदारी सोपवा.
- कार्यक्रमाचे इतिवृत्त लिहा.
COMMENTS