बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी अखेर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यास 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीतील सोडतीत समावेश झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया थेट मेपर्यंत सुरू राहणार आहे.
आरटीई'चे
वेळापत्रक जाहीर
बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार
इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर
प्रवेश देण्यासाठी अखेर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यास 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीतील सोडतीत
समावेश झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया थेट मेपर्यंत सुरू राहणार
आहे.
या कायद्यानुसार आर्थिक आणि दुर्बल घटक तसेच
मागासवर्गीयांच्या पाल्यांचे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्याचे स्वप्न
पूर्ण होत असले तरी दोन वर्षांपासून मात्र प्रक्रिया राबविण्या-कामी सरकारची
उदासीनता समोर येत आहे.
इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये 25
टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक असल्याने आधी संबंधित शाळांची नोंदणी होणे आवश्यक
आहे. गेल्या वर्षी जवळपास साडेसहाशे शाळांमध्ये साडेसहा हजारांच्या दरम्यान जागा
राखीव होत्या. प्रवेशप्रक्रिया राबविण्यास मात्र विलंब झाल्याने जवळपास 1,200 जागा रिक्तराहिल्या होत्या. यावर्षीही जागा रिक्त राहण्याची
पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.
प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
- 21 जानेवारीपासून शाळा नोंदणीला सुरुवात होणार असून, ही प्रक्रिया 6 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया 11
फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, 29 फेब्रुवारीपर्यंत सुरू
राहणार आहे.
- पहिली फेरीतील सोडत 11 आणि 12 मार्चला असणार आहे.
- सोडतीत समावेश झालेल्या बालकांना त्यांनी निवडलेल्या शाळेत
जाऊन प्रवेश घेण्यासाठी 16 मार्च ते 3
एप्रिलपर्यंत मुदत राहणार आहे.
- त्यानंतर प्रतीक्षा यादीतील बालकांना 13
ते 18 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
- दुसर्या फेरीत प्रतीक्षा यादीतील बालकांना 24
ते 29 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
- प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेश घेण्यासाठी चार टप्पे
राहणार असून,
- अखेरचा टप्पा 18 ते 22 मे पर्यंत सुरू राहणार आहे.
COMMENTS