पवित्र पोर्टल- 838 उमेदवारांची यादी जाहीर राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पवित्र पोर्टलमार्फतच्या शिक्षक भरतीत आता खास...
पवित्र पोर्टल- 838 उमेदवारांची यादी जाहीर
राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पवित्र
पोर्टलमार्फतच्या शिक्षक भरतीत आता खासगी व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय पर्याय
निवडलेल्या इयता नववी ते बारावीच्या गटातील शिक्षकांच्या पदांसाठी मराठी, इंग्रजी
माध्यमांच्या 838 शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध
करण्यात आलेली आहे. या उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागणार आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार
महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 नुसार
खासगी माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी ते दहावीच्या शिक्षक पदासाठी उत्तीर्ण आणि
उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता अकरावी ते बारावीच्या शिक्षक पदासाठी किमान व्दितीय
श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना विचारांत घेऊन नव्याने प्रक्रिया करण्यात आलेली आहे.
मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या 10 खासगी
शैक्षणिक संस्थातील आरक्षण आणि रिक्त पदे यानुसार शिफारस पात्र उमेदवारांच्या
संस्थानिहाय शिफारस पात्र उमेदवारांची यादी शासन परवानगी प्राप्त झाल्याने माजी
सैनिक व अन्य शिल्लक समांतर आरक्षणातील (भूकंपग्रस्त) वगळता योग्य उमेदवार उपलब्ध
झाले नाहीत अशी पदे त्या त्या प्रवर्गातील प्युअरमध्ये रूपांतरित करून गुणवतेनुसार
दुसरी शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
रयत शिक्षण संस्था (सातारा), श्री
स्वामी शिक्षण संस्था (कोल्हापूर), महात्मा फुले शिक्षण
संस्था ( सांगली) या संस्थांच्या दोन याद्या तर उर्वरित 7
संस्थाची शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या
लॉगिनवर निवडीचा तपशील उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी पवित्र
पोर्टल वर क्लिक केल्यानंतर होम पेज वर उपलब्ध असलेली शिफारस पात्र उमेदवारांची
यादी पहावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलवर
प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
इ ९ वी ते इ
१२ वी या गटातील खाजगी संस्थातील रिक्त पदासाठी शिफारस पात्र उमेदवाराची यादी
१). मा.उच्च
न्यायालय,खंडपिठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९
मध्ये दि २८/०८/२०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार खाजगी संस्थेतील इ. ९ वी ते इ १२
वी या गटातील पदासाठी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती )
नियमावली १९८१ नुसार खाजगी माध्यमिक शाळेतील ( इ ९ वी ते इ १० वी) पदासाठी उत्तीर्ण
आणि उच्च माध्यमिक शाळेतील ( इ ११ वी ते इ १२ वी) पदासाठी किमान व्दितीय श्रेणी
असणा-या उमेदवारांना विचारांत घेऊन नव्याने प्रक्रिया करण्यात आलेली आहे.
२). मा.
उच्च न्यायालय , खंडपिठ औरंगाबाद येथील याचिका क्र. ७९३८/२०१९ With
C.A. ९९८/२०२० , याचिका क्र. ८००१/२०१९ With
C.A. ८३०/२०२० व याचिका क्र. १२६०३/२०१९ मध्ये दिनांक ३१/०१/२०२०
रोजी दिलेल्या निर्णयानुसार OBC या संवर्गासाठीची एक जागा
वगळून इयत्ता ९ वी ते १२ वी या गटातील पदासाठी शिफारस पात्र ८३८ उमेदवारांची यादी
प्रसिद्ध करण्यात येत आहे.
३).
मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या १० खाजगी शैक्षणिक संस्थातील आरक्षण आणि रिक्त पदे
यानुसार शिफारस पात्र उमेदवारांच्या संस्थानिहाय शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9
to 12) Round-8)) आणि शासन परवानगी प्राप्त झाल्याने माजी सैनिक व
अन्य शिल्लक समांतर आरक्षणातील (भूकंपग्रस्त) वगळता योग्य उमेदवार उपलब्ध झाले
नाहीत अशी पदे त्या त्या प्रवर्गातील ‘Pure’ मध्ये रूपांतरित
करून गुणवतेनुसार दुसरी शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher
(9 to 12) Converted Round-9)) प्रसिद्ध करण्यात येत आहे.
४). रयत
शिक्षण संस्था सातारा, श्री स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूर,
महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर ता. वाळवा जिल्हा सांगली या
संस्थांच्या दोन याद्या ((Graduate Teacher (9 to 12) Round-8 And Graduate
Teacher (9 to 12) Converted Round-9)) तर उर्वरित ७ संस्थाची
शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Round-8)) प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
५). शिफारस
पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांच्या लॉगिनवर निवडीचा
तपशील उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी पवित्र पोर्टल वरील Applicant वर क्लिक केल्यानंतर होम पेज वर उपलब्ध असलेली शिफारस पात्र उमेदवारांची
यादी पहावी.
६).यादीतील
उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी आपल्याशी संबंधित संस्थेच्या नियुक्ती प्राधिकारी
यांचेशी दि. १५/०२/२०२० पर्यंत संपर्क साधावा.
visit-www.thenokari.com
COMMENTS