⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षेला जाताना घ्या 'ही' काळजी


शिष्यवृत्ती परीक्षेला जाताना घ्या 'ही' काळजीमहाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत ही परीक्षा राज्यभर घेतली जाते. राज्यातल्या आठवी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी १६ फेब्रुवारी रोजी होत आहे.  विद्यार्थ्यांना एव्हाना त्यांचे प्रवेशपत्र मिळालेले असेल.परीक्षेपूर्वी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचाही जास्तीत जास्त सराव करा...
परीक्षेला जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा :
  • - आपल्या प्रवेशपत्रात नमूद केलेल्या परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेपूर्वी किमान एक दिवस अगोदर पालकांना ठाऊक असावा, जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही.
  • - परीक्षेपूर्वी किमान अर्धातास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे गरजेचे आहे.
  • - पेपर हाती पडल्यावर उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्याअगोदर मुखपृष्ठावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • - कॅल्क्युलेटर, मोबाइल, पुस्तके आदी साहित्य परीक्षा केंद्रावर नेऊ नये.
  • - उत्तरे नोंदवण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा. प
  • - प्रश्नपत्रिका संचकोड उत्तरपत्रिकेवर अचूक वर्तुळ रंगवून भरा.
  • - उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाणार आहे. त्यामुळे ती फाटणार नाही, चुरगळणार नाही याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम