HSC-SSC Board Exam केलेला अभ्यास लक्षात राहात नाही ? मग करून पाहा 7 गोष्टी अभ्यास तर झाला आहे मात्र रिव्हिजन करताना लक्षात राहात नाही...
HSC-SSC Board Exam केलेला अभ्यास लक्षात राहात
नाही? मग करून पाहा 7 गोष्टी
अभ्यास तर झाला आहे मात्र रिव्हिजन करताना लक्षात राहात नाही
किंवा भीतीपोटी सगळं विसरायला होतं.
परीक्षा अगदी जवळ आली आहे. अशावेळी शेवटच्या क्षणी भीतीनं
किंवा ओव्हर कॉन्फिडन्समुळे आठवणं बंद होतं किंवा आपण ब्लँक होतो अशावेळी आपल्याला
काहीच सुचत नाही ही वेळ शेवटच्या क्षणी येऊ नये यासाठी आज आम्ही आपल्याला काही
सोप्या टिप्स सांगणार आहोत.
- 1.रिव्हिजनला सुरुवात करण्याआधी आणि पेपर लिहिण्याआधी दोन मिनिटं शांत बसा आणि स्वत:च्या मनाला सांगा मला सगळं चांगलं जमणार आहे आणि मी वाचलेलं सगळं लक्षात राहणार आहे.
- 2. रोज अर्धा तास तरी व्यायाम किंवा योगासन करा. त्यासोबत प्राणायामही करायला हवा. प्राणायमानं एकाग्रता वाढते. यावेळात शक्य असेल तर शांत म्युझिक लावून करा. यामुळे मनाला शांतता मिळते.
- 3. परीक्षा संपेपर्यंत मोबाईलपासून कटाक्षानं दूर राहा. याशिवाय आपण जे वाचलं ते सतत आठवण्याचा प्रयत्न करा. त्याची रिव्हिजन करा.
- 4. रात्रीच्या वेळी आवश्यक असणारी झोप पूर्ण घ्या. परीक्षा काळातही किमान 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यानं आपला मेंदू तल्लख राहातो.
- 5. रोज 20 मिनिटं ध्यान करा. मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपली एकग्रता वाढते याशिवाय आपण विसरणार नाही याची खात्री वारंवार स्वत:च्या मनाला द्या. आत्मविश्वास वाढवा.
- 6. आहार, आपल्या आहाराचाही आपल्यावर परिणाम होत असतो. परीक्षेच्या काळात पौष्टीक आहार घ्या. ज्यामुळे अति आळस येणार नाही किंवा आजारी पडण्याची भीती राहणार नाही. दूध, फळ खाण्यावर अधिक भर द्या.
- 7. स्वत:वर विश्वास ठेवा. मनातील भीती दूर करा. भीतीमुळे बऱ्याचवेळा येत असूनही आपण अभ्यासातल्या गोष्टी विसरतो.
COMMENTS