⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

करोना विषाणूची कॉलरट्यूनमुळे वैतागले हा घ्या उपाय.

जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून राज्य सरकार, रूग्णालये, सामाजिक संस्था व संघटना या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहे. सध्या मोबाइलवर ऐकू येणारी करोना व्हायरसची माहिती देणारी कॉलरट्यूनमुळे ग्राहक वैतागले आहे.
करोनाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारकडून लावण्यात आलेल्या कॉलरट्यूनची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या ऑडिओच्या सुरुवातीलाच येणारा खोकल्याचा आवाज ऐकल्यावर चिडचिड होते, अशी प्रतिक्रियाही सर्वसामान्यांमध्ये उमटत आहे.
शिंक, खोकला यामुळे पसरणारे रोग हे खूप जास्त संसर्गजन्य असतात.त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम स्त्युत्य आहे. मात्र, ही कॉलरट्यून काढून टाका, असाही सूर ऐकू येतो. तर भारतासारख्या देशामध्ये अशा आजारांबाबत या कॉलरट्यूनमुळे अधिक वेगाने जनजागृती होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
आपल्याला योग्य बटन जर आपण लागले आणि सुरक्षित राहून झटपट कामे करू शकतो. त्यासाठी कॉल लावल्यानंतर हॅश(#) बटन प्रेस करावे. यानंतर लागलीच आपला कॉल कनेक्ट होईल.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मोबाईलवर खोकल्याची कॉलर ट्यून ऐकायला मिळते आहे. यामुळे प्रत्येकजण वैतागला असेल पण काळजी करू नका,
यावर उपाय सापडला असून कॉलर ट्यून वाजल्यास हॅश(#) दाबून आपण कॉल उचलून न कोणत्याही अडथळ्याविना बोलू शकता.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम