सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने नवे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. सीबीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये करोना विषाणूसंबंधीची जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे क्रमांक जारी केले आहेत. सीबीएसईचे हे क्रमांक सकाळी १० ते दुपारी १.३० आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
सीबीएसई बोर्डाने सुरू केले नवे हेल्पलाइन क्रमांक
CBSE Board New Help Line No.
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने नवे
हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. सीबीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये
करोना विषाणूसंबंधीची जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे क्रमांक जारी केले आहेत.
सीबीएसईचे हे क्रमांक सकाळी १० ते दुपारी १.३० आणि दुपारी २ ते सायंकाळी ५
वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
ही हेल्पलाइन प्रामुख्याने जनजागृतीसाठी आहे. या
क्रमांकांवर संपर्क साधून विद्यार्थी करोना व्हायरसपासून स्वत:चा आणि इतरांचा बचाव
करण्याच्या उपाययोजना, मार्गदर्शक तत्वे यांची माहिती मिळवू
शकतात. याव्यतिरिक्त सध्या घरीच असलेले हे विद्यार्थी अभ्यास कसा करायचा आहे
याचीही माहिती या क्रमांकांवर मिळवू शकणार आहेत.
हे आहेत सीबीएसईचे नवे हेल्पलाइन क्रमांक
- 1. 98999912742.
- 2. 8826635511
- 3. 9717675196
- 4. 9999814589
(वेळ – सकाळी १० ते
दुपारी १.३०)
- 1. 9811892424
- 2. 9899032914
- 3. 9599678947
- 4. 7678455217
- 5. 7210526621
(वेळ – दुपारी २ ते
सायंकाळी ५)
सीबीएसईच्या नव्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांचे मानसिक
समुपदेशनही सुरू राहणार आहे. विद्यार्थी ३१ मार्च पर्यंत १८००-११-८००४ या
क्रमांकावर संपर्क साधू शकता. हा क्रमांक टोल फ्री आहे.
विद्यार्थी घरी अभ्यास करण्यासाठी दीक्षा अॅपचा वापर करू
शकता. शाळा बंद असल्याने सर्व अभ्यास दीक्षा अॅप वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या
परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. ज्या विषयांच्या परीक्षा
झाल्या आहेत, त्यांची उत्तरपत्रिका तपासणीचं कामही सध्या
थांबलेलं आहे.
Like us On
Facebook www.facebook.com/thenokari Daily Job
Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
रोज नवीन
नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी The Nokari ला Follow
करा आणि मित्रांना शेअर करा.
COMMENTS