⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षक भरतीचा मुहूर्त लॉकडाऊन संपल्यानंतरच गती मिळणार


शिक्षक भरतीचा मुहूर्त लॉकडाऊन संपल्यानंतरच गती मिळणार

Mega Shikshak Bharti 2020मेगा शिक्षक भरती २०२०

Teachers Bharti after the Lockdown: पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दीर्घकाळ रखडलेली शिक्षक भरती सुरू करण्यासाठी शासनाने हालचाल सुरू केली होती. मात्र, आता लॉकडाऊन मागे घेतल्याशिवाय पुन्हा हे चक्र सुरळीत होऊ शकणार नाही. तर राज्यामध्ये असणाऱ्या जिल्हाबंदीचा निर्णय शिथील केल्याशिवाय खासगी संस्थांनाही शिक्षक भरती करता येणे कठीण होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने शिक्षक भरतीच्या मुहूर्तावरदेखील याचे सावट आहे. अगोदरच नकटीच्या लग्नास सतराशे विघ्नया उक्तीनुसार ही भरतीप्रक्रिया दीर्घकाळ रखडली आहे. यातच करोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनची भर यात पडली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी मोठ्या कालावधीनंतर सुमारे दीड वर्षापूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या रिक्त जागा पुन्हा भरण्याचा निर्णय घेतला होता. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पवित्र पोर्टलही सुरू करण्यात आले होते. या पोर्टलद्वारे भरतीवरून देखील मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. या भरतीत सुरुवातीपासून काही ना काही अडसर येत गेला यातच आता करोनाच्या फटक्याची मोठी भर यात पडली आहे. शिक्षण विभागाच्या वतीने यंदा मार्च अखेरपर्यंत ही भरतीप्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न होता. या माध्यमातून राज्यातील सुमारे बारा हजारावर जागांची भरती होण्याची अपेक्षा उमेदवारांमध्ये होती. मात्र आता प्रक्रियेत अडकलेल्या उमेदवारांची भरती करोनामुळे आणखीच प्रलंबित राहण्याची भीती उमेदवेारांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

TET Results Will Be Postponed टीईटीचा निकालही लांबणीवर
दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) या परीक्षेचा निकालदेखील लांबणीवर पडला आहे. या परीक्षेची अंतरीम उत्तरसूची जाहीर करण्यात आल्याने उमेदवारांना अंतिम निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यंदा शासनाने नवीन नियमानुसार काही नवीन वर्गवारीसाठी गुणांचीही सवलत वाढविली आहे. नव्या नोंदींनुसार निकषांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांना या सवलतीचा फायदाही देण्यात येत आहे. मात्र यंदा करोनाच्या फटक्याने टीईटी परीक्षेचाही निकाल लांबल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
संकलन : मटा
TAG- Mega Shikshak Bharti 2020,Teachers Bharti after the Lockdown

****************************************************************************

पवित्र शिक्षक भरती एप्रिलनंतर करणार
करोनाच्या लॉकडाऊनचा परिणाम मुलाखतीशिवाय शिक्षक भरती प्रक्रियेवर झाला आहे.आता ही प्रक्रिया एप्रिलनंतर होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
राज्यात पवित्र पोर्टल मार्फत गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. दहा वर्षानंतर होत असलेल्या या भरती प्रक्रियेची डीटीएड, बीएड पदविका, पदवीधारक बेरोजगारांना प्रतीक्षा आहे. मात्र, विविध टप्प्यावर ही प्रक्रिया अडखळली. त्यात आता करोनाच्या प्रादुर्भावाने केलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती थांबवण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. त्यात असे म्हटले आहे की, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पद भरती करोनामुळे सध्या बंद असून, ३१ मार्च दरम्यान परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरती प्रक्रियेत तत्कालीन सरकारने राज्यातल्या २४ हजार जागा भरण्यात येतील असे सांगितले होते. प्रत्यक्षात पाच हजार ते सहा हजार जागाच भरण्याची प्रक्रिया झाली. त्यामध्येही शासकीय पातळीवरच्या संस्थांमधीलच शिक्षक भरती प्रक्रिया झाली. खासगी संस्थांवरील भरतीची प्रक्रिया कधी आणि केव्हा होणार, असा प्रश्‍न अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६० हजारपेक्षा अधिक आहे तर, अभियोग्यता चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अशा करण्यात आल्या सूचना
पवित्र प्रणाली मार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीच्या नऊ ऑगस्टच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर विषयनिहाय, प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेली पदे, गैरहजर उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे, उमेदवार अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठीची निवड प्रक्रिया प्रथम करण्यात येणार आहे. ही कार्यवाही मुलाखतीसाठीची यादी जाहीर करण्यापूर्वी करण्यात येणार आहे. मुलाखतीसह पद भरतीमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, त्यांना एमईपीएसच्या नियमानुसार खासगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत.
ज्या उमेदवारांना यापूर्वी अकरावी, बारावीच्या गटांसाठी ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, परंतु असे उमेदवार पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत.
नववी, दहावी या गटातील पदासाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण परंतु ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, अशा उमेदवाराकडून मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आली होती. त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पद भरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत, त्यांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.
काळजीपूर्वक नोंद गरजेची
या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने मुलाखतीसह पदांचे प्राधान्यक्रम देणार आहेत, त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करण्याची सुविधा दिली नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून सेव्ह करून येणाऱ्या फॉर्मसमोर ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही.
सौर्स मटा

Like us On Facebook www.facebook.com/thenokari Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
Telegram Channel- https://t.me/thenokari
रोज नवीन नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी The Nokari ला Follow करा आणि मित्रांना शेअर करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम