आरटीईअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र, व्दितीय सत्रातील आकारिक मूल्यमापनानुसार आणि इयत्ता नववी व अकरावीचे प्रथम सत्र अखेरचे मूल्यमापन आणि व्दितीय सत्रातील अंतर्गत मूल्यमापनापैकी वीस गुणांच्या विविध प्रकारांपैकी जे कामकाज 13 मार्चअखेर उपलब्ध आहे. या दोन्हींची सरासरी घेऊन निकाल तयार करावा, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आज (ता.२४) जारी केले आहेत.
शाळांच्या निकालाबाबत शासनाने घेतलेला मोठा निर्णय
A big decision taken by the government regarding the results of schools: आरटीई(RTE) अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या
विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र, व्दितीय सत्रातील आकारिक मूल्यमापनानुसार
आणि इयत्ता नववी व अकरावीचे प्रथम सत्र अखेरचे मूल्यमापन आणि व्दितीय सत्रातील
अंतर्गत मूल्यमापनापैकी वीस गुणांच्या विविध प्रकारांपैकी जे कामकाज 13 मार्चअखेर उपलब्ध आहे. या दोन्हींची सरासरी घेऊन निकाल तयार करावा,
असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आज (ता.२४) जारी केले
आहेत.
शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी व्हिडिओ
कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केले. ते म्हणाले, "निकालासंदर्भात कोणतेही
स्वतंत्र मार्गदर्शन प्रशासनामार्फत दिले जाणार नाही. झालेले शासन निर्णय
काळजीपूर्वक अभ्यासून शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर निकालाबाबत नियोजन
करणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे13 मार्च
2020 पासून शैक्षणिक कामकाज बंद आहे. शासनाच्यावतीने
मूल्यमापनात संदर्भात 20 मार्च 2020 रोजी
प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आरटीईअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या द्वितीय
सत्रातील परीक्षा रद्द केल्याचे घोषित केले आहे. त्यांचे मूल्यमापन प्रथम सत्र
अखेर पूर्ण झाले आहे. त्याशिवाय व्दितीय सत्रातील आकारिक मूल्यमापन जे 13 मार्च 2020 अखेर उपलब्ध असेल त्यानुसार निकाल तयार
करून श्रेणी देण्यात यावी, असे सांगण्यात आले.
शासनाने 13 एप्रिल 2020 रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता नववी व अकरावी यांचे प्रथम
सत्र अखेरचे मूल्यमापन आणि द्वितीय सत्रातील अंतर्गत मूल्यमापन पैकी वीस गुणांच्या
विविध प्रकारांपैकी जे कामकाज 13 मार्च 2020 अखेर उपलब्ध असेल या दोन्हींची सरासरी घेऊन निकाल तयार करावा. या सरासरीला
प्रचलित पद्धतीनुसार भाषा विषय गट गणित व विज्ञान गट उत्तीर्णतेचे निकष व सवलतीचे
गुण यांच्या आधारे अंतिम निकाल तयार करण्यात यावा.
दरम्यान, यात अनुत्तीर्ण
होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पुनर्रपरीक्षेची संधी
नियमानुसार मिळेल. या सर्व कामकाजात 8 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयास अधीन राहून मूल्यमापन करावे. निकाल तयार करणे लॉकडाऊन
काळात शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. तीन मेच्या पुढे परिस्थितीनुसार निकालाच्य
तारखेबाबत योग्य आदेश येईल.
- सकाळ न्यूज
COMMENTS