⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे शैक्षणिक सत्राचा आरखडा तयार

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे शैक्षणिक सत्राचा आरखडा तयार Maharashtra State Teachers' Council prepares the plan of the academic session

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे शैक्षणिक सत्राचा आरखडा तयार

Maharashtra State Teachers' Council prepares the plan of the academic session 

शैक्षणिक सत्राबाबत राज्य शासनाने सूचना मागितल्या नुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे  नियोजन प्रारूप आराखडा सदर करण्यात आला असल्याची माहिती परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे व उपाध्यक्ष मोहन ओमासे यांनी सांगितली.

शासनाला सादर केलेले  आराखड्यातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे :-
  • ·        कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शैक्षणिक सत्र सुरु करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावरच टप्प्या- टप्प्याने सत्र सुरु करावे. यामध्ये  इयत्तांचे  १ ते ५,  ६ ते ८ ,  ९ ते १२ व महाविद्यालयीन असे टप्पे असावेत.
  • ·        पूर्व प्राथमिक शाळा शक्यतो सुरु करू नयेत.
  • ·        नवीन प्रवेश RTE नुसार व केंद्रीय पद्धतीने करावेत.
  • ·        भौतिक सुविधा, सॅनिटायझर व मास्क इत्यादी शाळांना पुरवण्यात यावेत.
  • ·        शाळा, महाविद्यालयाच्या कार्यालयिन कामाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ असावी. एका वर्गात २० ते २५ विद्यर्थी असावेत. याकरिता विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत बोलवावे. गरजेनुसार शिक्षक पदे मंजूर करावीत.
  • ·        प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात एक शारीरिक शिक्षण शिक्षक असावेत.
  • ·        नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन असू नये. परंतु आवश्यक इयत्ता निहाय क्षमता विकसित करण्याचे काम शिक्षकांनी करावे. 
  • ·        अध्यापनासाठी अत्यावशक कामाचे दिवस उपलब्ध करून देण्यासाठी सुट्ट्यांचा कालावधी कमी करावा. 
  • ·        अध्यापनातून  विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक क्षमता निर्माण करण्यसाठी स्वाध्याय प्रक्रियेचा वापर करावा.
  • ·        ऑनलाईन अध्यापन हा पर्याय नसून तो पूरक आहे. त्याप्रमाणे त्याचा वापर व्हावा.
  • ·        मध्यान्ह भोजन व्यवस्था शैक्षणिक सत्रापुरती स्थगित ठेवावी. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भौतिक दुरतेचे पालन करून तांदूळ वाटप करावा. 
  • ·        एकाच परीसरातील शाळांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा भरणे व सुटण्याची वेळ यामध्ये अंतर असावे. 
  • ·        सत्राच्या सुरुवातीला सर्वांची (शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी ) कोरोना रॅपीड टेस्ट घ्यावी. 
  • ·        शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा विमा काढण्यात यावा.
  • ·        या शैक्षणिक वर्षात शिक्षकांना अतिरिक्त करू नये. 
  • ·        इयता १२ वीचा पाठयक्रम  चालू वर्षाकरीता जुनाच ठेवावा .
  • ·        नवीन शिक्षक भरती बंदीतून आरोग्य विभागाप्रमाणे शिक्षण विभागाला वगळावे .

शिक्षणातील खालील प्रलंबित महत्वाच्या समस्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात :- 

  • ·        अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यावरील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिनांक १ एप्रिल २०१९ पासून २० % वेतन अनुदान तसेच अंशता अनुदानित प्राथमिक , माध्यमिक  शाळा व वर्ग तुकड्यावरील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना २० % वेतन देण्यासंदर्भात शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा.
  • ·        अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढून अनुदान देण्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करावा. 
  • ·        उच्च माध्यमिक शाळातील सन २००३ ते २०१९ या कालावधीत प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना शासन मान्यता प्रदान करून वेतन अनुदान वितरीत करावे.  
  • ·        टी. ई. टी. ग्रस्त शिक्षकांचे जानेवारी २०२० पासूनचे रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून करावे .
  • ·        अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक  स्तर ) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारक यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करावे व  समयोजित करावे .
  • ·        रात्रशाळेला पूर्ण वेळ शाळेचा दर्जा द्यावा.

विद्यार्थी हे राष्ट्राची संपत्ती आहेत त्यानुसार त्यांच्या जीविताचे रक्षण करणे गरजेचे आहे. १५ व २६ जूनपासून कोणत्याही परिस्थितीत शाळा, महाविद्यालय सुरु करू नयेत. कोरोना संकट पूर्णपणे संपुष्टात आल्याची खात्री झाल्यावर शाळा व महाविद्यालय सुरु करावेत असेही नमूद करण्यात आले आहे. 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम