राज्य शिक्षण आयुक्तांचा मोठा खुलासा : शाळांची तारीख ठरली पुणे : कोरोनामुळे दोन महिन्यापासून बंद असलेल्या शाळांमधील अध्यापन 15 जूनपासून सुर...
राज्य शिक्षण आयुक्तांचा मोठा खुलासा:शाळांची
तारीख ठरली
पुणे : कोरोनामुळे दोन महिन्यापासून बंद असलेल्या शाळांमधील
अध्यापन 15 जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरवातीला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शिकवले जाणार आहे.
ग्रीन झोनमध्ये शाळाही भरणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष सुरू
करण्यासाठी तयारी केली आहे. त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण
सचिव आणि शिक्षण आयुक्त यांच्या सातत्याने चर्चा करीत आहेत. त्यात येत्या 15
जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयापर्यंत हा विभाग
आलेला आहे. त्यामुळे शाळांचे वर्ग सुरू झाले नाही, तरी
अध्यापन मात्र सुरू केले जाणार आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी याबाबत सकाळला
माहिती दिली. ते म्हणाले, "विद्यार्थ्यांची सुरक्षितता
महत्त्वाची आहेच; पण त्यांचे शैक्षणिक नुकसानही होऊ नये
म्हणून आम्ही 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करीत आहोत.
त्यामुळे अध्यापनासाठी विविध पर्यायांचा विचार करीत आहोत. सुरवातीला डिजिटल
प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अध्यापन सुरू होईल. टीव्ही, स्थानिक
केबल यांसह व्हर्च्युअल क्लासरूम या माध्यमातून शिकविणे सुरू होईल. " शहरी
भागात कोरोनाचा फैलाव अधिक आहे. या भागात वर्ग सुरू करता येणार नाहीत. शहरातील
विद्यार्थ्यांचा विचार करता अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचाही विचार सुरू
आहे. त्यासंबंधी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आढावा घेत आहे,"
असे त्यांना सांगितले.
टीव्ही चॅनेलबरोबर स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून
अध्यापनाचे व्हिडिओ विद्यार्थांपर्यंत पोचविले जाणार आहेत. शैक्षणिक कामकाज सुरू
करण्याबाबत या क्षेत्रातील विविध घटकांशी चर्चा सुरू आहे. शिक्षक आणि
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेऊनच अध्यापन सुरू करण्यात येणार आहे.
याबाबत शिक्षणमंत्री देखील आमच्याबरोबर सातत्याने चर्चा करीत आहेत, असे
सोळंकी यांनी स्पष्ट केले.
-सकाळ
COMMENTS