वेबिनार(दिनांक 9 मे 2020)मधील काही मा.आयुक्त विशाल सोळंकी साहेबांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे
वेबिनार(दिनांक 9 मे 2020)मधील काही मा.आयुक्त विशाल सोळंकी साहेबांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे
- 1) पुढील शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे. 2 ते 3 महिने आपल्याला कदाचित होम लर्निंग अभ्यास पूर्ण करून घ्यायचे आहे. दररोज 2 तासा पेक्षा अधिक काळ अभ्यास देऊ नये.
- 2) तंत्रस्नेही शिक्षक यांनी अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासक्रम तयार करावा.
- 3) लवकरच शैक्षणिक चॅनेल सुरू करणार किंवा दूरदर्शन व सह्यादी वाहिनीवरून अभ्यासक्रम पूर्ण करून घेणार.
- 4) पुढील वर्षात केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी भरती शक्य नाही त्यासाठी 2 ते केंद्र/बिट यांचा पदभार घ्यावा किंवा इतर मुख्याध्यापक/शिक्षक यांची मदत घ्यावी.व आवाहन पेलावे.
- 5) PGI मध्ये महाराष्ट्र देशात 802 गुणांसह पहिल्या 3 मध्ये आहे लवकरच पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र नक्की जाणार त्यासाठी सर्वांची मदत लागणार.
- 6) सरल व युडायस यांच्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. यासाठी दोन्ही एकत्र आणणार.
- 7) शालेय पोषण आहार वाटप सर्वाना व्यवस्थित वाटप केले भविष्यात देखील याप्रमाणे कार्य करावे.
- 8) आर्थीक संकट ओढवल्याने अनेक विद्यार्थी कुटुंबाला मदत म्हणून मजुरी करतील यासाठी नवीन उपाययोजना करून शाळाबाह्य कुणी राहणार नाही यासाठी सर्व मिळून उपाययोजना करणार आहोत.
- 9) विद्यार्थी आधार कार्ड 100% पूर्ण करून संचमान्यता करणार. 402 तालुक्याना आधार किट दिलेले आहे. त्यासाठी 804 टेक्निकल पर्सन नेमून कॅम्प लावून 100% आधार कार्ड पूर्ण करून घेणार
- 10) जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा यावर्षी प्रवेशोत्सव स्पेशल असणार आहे.
- 11) यावर्षी प्रायव्हेट शाळांची फी परवडू न शकल्याने आपल्याकडे पट वाढणार. त्यासाठी अर्थ विभागाकडे विंनती करून 1 ते 8 वर्गासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.
- 12) प्रायव्हेट शाळांना यावर्षी फी वाढ करू देणार नाही. फी साठी टप्पे पडणार.
- 13) लर्न फ्रॉम होम साठी स्मार्ट कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू. होम लर्निंग पॅकेज येणार.व्हाटस अँप व इतर गोष्टी त्यातून शिक्षक व्हाटस अप माहिती, पालक व्हाटस अप, सुविधा यांचे सर्वेक्षण केंद्रप्रमुख यांच्या मार्फत करून पुढील आराखडा तयार करणार.
मा.आयुक्त विशाल सोळंकी साहेब- संकट मोठे आहे, पण संकटापेक्षा माणूस मोठा आहे त्यासाठी आपण सर्व कार्य करणार आहोत.
COMMENTS