⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते की........

सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते की........

सर्वविद्यार्थांना सूचित करण्यात येते की आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल किंवा या कोरोनाच्या कालखंडामुळे आपला व्यवसाय-नोकरीत आर्थिक नुकसान झाले असेल तर पालकांना 
  • online शिक्षणासाठी नवीन मोबाईल- टॅब घेण्यासाठी आग्रह करु नये.
  • विद्यार्थ्यांनी पुस्तकं विकत घेवून स्वयंअध्ययन  करावे.
  • जीवनात जी-जी माणसं मोठी झाली आहेत त्या सर्वांनी स्वयंअध्ययनच केले आहे.
  • सध्याचा कालखंड हा स्वविकासासाठी खूप महत्त्वाचा आहे.
  • म्हणून आपल्याला जे-जे आवडतं ते-ते करा.
  • सततमोबाईलच्या आहारी जावू नका.
  • पालकांशी संवाद साधा .  
  • मनमोकळ्या गप्पा मारा.
  • अभ्यासाचा ताण न घेता आनंदाने अभ्यास करा .
  • एखाद दिवशी पालकांना महत्त्वाचे काम असल्यामुळे मोबाईल मिळाला नाही तर जास्त पॅनिक होवू  नका.
  • नंतर अभ्यास करा .
  • पालकांनाही समजून घ्या.
  •  ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी  जास्त विचार करण्याची गरज नाही.
  • या परिस्थितीवर मात करुन पुढे जायला शिका .
  • जीवनात परिस्थितीची जाणीव असणारीच माणसं मोठी झालेली आपल्याला पहायला मिळतात.
  • काही दिवसात शाळा सुरु होईल.
  • २-३ महिने ४-६ महिने शाळा उघडली नाही.
  • अभ्यास करायला मिळाला नाही त्याने जास्त काही फरक पडणार नाही. जीवनात प्रत्येक क्षणी आपण शिकतच असतो.नवनवीन ज्ञान प्राप्त करत असतो.म्हणून पालकांनीही जास्त विचार करण्याची गरज नाही.
  • आपले आणि आपल्या पाल्याचे, कुटुंबाचे आत्मबल वाढविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेच आहे.
सदर संदेश ज्या मित्रांकडे मोबाईल नाही त्यांच्यापर्यंत पोहचवा .
शिक्षणापासून कोणीही  वंचित राहणार नाही यासाठी शासन-शाळा सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत.    
    

घरी थांबा, सुरक्षित रहा

-आपला ठाकरे ब्लॉग टिम

आपल्या सर्व शैक्षणिक ग्रुप अथवा मित्रांना नक्की शेअर करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम