इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यासंदर्भात
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण वाहिन्यांवरुन
प्रसारित करण्यासंदर्भात NCERT आणि रोटरी इंडिया यांच्यात
सामंजस्य करार
ई-
शिक्षणाची प्रक्रिया अधिक विधायक
आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (NCERT)
आणि रोटरी इंडिया या संस्थेच्यामध्ये डिजिटल माध्यमातून एक सामंजस्य
करार करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी NCERT
टीव्ही वाहिन्यांवरून अभ्यासक्रम प्रसारित करण्याबाबतचा हा करार
आहे. हे प्रसारण जुलै 2020 पासून उपलब्ध असणार आहे.
कोविड-19 महामारीच्या
काळात घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास विनाअडथळा चालू राहावा या उद्देशाने
रोटरी इंडीया ह्यूमेनीटी फाउंडेशन आणि NCERT यांनी एकत्र येत
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या करारामुळे NCERTचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ई-शिक्षण मार्फत देशभरातल्या
विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
ठळक बाबी
- ई-शिक्षण अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या ‘दीक्षा’ या मोबाईल अॅपवरूनही उपलब्ध असणार आहे.
- सध्या हा अभ्यासक्रम हिंदी भाषेत (आणि पंजाबी) उपलब्ध असून तो 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातल्या 10 लक्ष विद्यार्थ्यासाठी त्वरित उपलब्ध केला जाणार आहे. तसेच येत्या काही महिन्यात सर्व प्रादेशिक भाषांमध्ये तो भाषांतरित केला जाणार आहे.
- ‘विद्यादान-2.0’ या अभियानाच्या अंतर्गत, रोटरी इंटरनॅशनल NCERTला पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेतल्या अभ्यासक्रमाचा मजकूर पूरवणार आहे.
- त्याशिवाय, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील रोटरी क्लब आवश्यक ती साधने आणि अभ्यासक्रम पुरवणार आहे. तसेच प्रौढ साक्षरता अभियानातही पूर्ण योगदान देणार आहे. ते शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षणासाठीही अभ्यासक्रम देणार आहेत.
- विविध योजना आणि उपक्रम, जसे की ऑपरेशन डिजिटल बोर्ड, दीक्षा, ई-पाठशाला, स्वयं आणि स्वयंप्रभा अशा उपक्रमांच्या माध्यमातून तंत्रज्ञान, कल्पकता आणि शिक्षण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.
- एनसीइआरटी टीव्ही टाय अप: पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम मोड्यूल्सचे प्रसारण केले जाईल. हे प्रसारण जुलै 2020 पासून उपलब्ध असेल. (अभ्यासक्रम एनसीआरटी च्या मान्यतेनुसार असेल)
-
दीक्षा एप टाय-अप : ई-लर्निंग मोड्युल केंद्र सरकारचे राष्ट्रीय मोबाईल एप, दीक्षा वरूनही उपलब्ध असेल.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url