Differences between Bio-data, Resume and CV (Curriculum Vitae) differences of bio data and resume#cv resume biodata difference#difference between bio data and resume#difference between cv bio data and resume#difference between bio data resume and c.v#difference between resume bio data and curriculum vitae#difference between bio data and curriculum vitae
Bio- data, Resume आणि CV (Curriculum Vitae) या मधील फरक
Differences between Bio-data, Resume and CV (Curriculum Vitae)
नोकरीसाठी अर्ज करताना Bio-data, Resume
की CV (Curriculum Vitae) यामध्ये काय फरक आहे.
खूप लोकांना असे वाटते की ते सर्व एकच तर आहे. तेव्हा या तिघांचा नेमका फरक समजून
घेवूया.
Bio- data -
- ·
Bio- data म्हणजेच बायोग्राफिकल डाटा.
- ·
Bio- data हा एक ते तीन पानांपर्यंत असतो.
- ·
Bio- data हा शब्द Resume किंवा Curriculum Vitae ला पर्यायी जुना शब्द आहे.
- ·
Bio- data मध्ये शिक्षण आणि कामाच्या
अनुभवासोबतच आपली वैयक्तिक माहिती जसे की जन्म तारीख, लिंग,
धर्म, जात, घरचा पत्ता,
राष्ट्रीयत्व इ. असते.
- ·
Bio- data मध्ये Resume पेक्षा बरीच अधिक माहिती नमूद केलेली असते. त्यामुळे उमेदवाराची वैयक्तिक
पार्श्वभूमी देखील समजू शकते.
- ·
आपल्याकडे भारतात शासकीय नोकरीच्या
अर्जाच्या वेळेस Bio- data दिला जातो.
- ·
तसेच विशेषतः लग्न जमवण्यासाठी बनवल्या
जाणार्या टिपणाला देखी Bio- data म्हणतात.
- ·
आपल्याकडे Bio- data हा शब्द लग्न जुळवण्यासाठीच जास्त प्रचलित आहे.
- ·
मात्र जर एखाद्या मुलाखती साठी आपल्याला Bio- data मागवलाच तर आपल्याला त्यात काय
काय नमूद करायचे हे आपण पाहूया-
- · सुरुवात अर्थातच आपण आपल्या करियर मधील ध्येय मांडू शकतो.
- · आपण अर्ज करत असलेली जागा आपल्यासाठी कशी योग्य आहे हे देखील मांडता येते.
- ·
हा Bio- data असल्याने आपण यात आपली वैयक्तिक माहिती(Personal
information) नमूद करूच शकतो किंबहुना ती अपेक्षितच असते.
- ·
यानंतर कामाचा अनुभव, आतापर्यंत
घेतलेल्या प्रत्येक कामाच्या अनुभवाबद्दल मग तो अनुभव संबधित नसला तरीदेखील तुम्ही
इथे नमूद करणे अपेक्षित असते.
- · यामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणच्या दररोजच्या जबाबदार्या देखील इथे नमूद करायच्या.
- ·
याशिवाय कामाच्या अनुभवाशिवाय असलेली
कौशल्ये जसे की एखादे सॉफ्टवेअर हाताळणे, एखादी भाषा इ.
नमूद करायचे. सर्वात शेवटी आपली शैक्षणिक माहिती नमूद करायची.
Resume -
- ·
Resume मध्ये आपले शिक्षण, कौशल्ये आणि अनुभव हे सर्व सारांश रूपात मांडलेले असते.
- ·
बहुतांश Resume हा 1 ते 2 पानांचा असतो.
- ·
यामध्ये अगदी प्रत्येक अनुभव अथवा माहिती
नमूद करण्यापेक्षा ज्या नोकरीसाठी आपण अर्ज करत आहोत फक्त त्या संबंधित असलेला
आपला अनुभव, कौशल्य थोडक्यात लिहिले गेले पाहिजे.
- ·
आपला Curriculum
Vitae(CV) हा मुलाखत घेताना समोरच्याला
आपल्याकडून समजतोच तेव्हा रेज्युम जेव्हा मागवला जातो तेव्हा अगदी संक्षिप्त
माहिती(Brief information) अपेक्षित असते.
- ·
अनुभवासाठी सामान्यतः ध्येय, शैक्षणिक
अर्हता, पूर्ण केलेले प्रोजेक्ट, कौशल्ये,
आवड असलेले क्षेत्र अशा क्रमाने ही माहिती नमूद करावी.
- ·
मुलाखत घेणार्याला Resume निवडण्यासाठी फार वेळ घालवायचा नसतो. त्यासाठी तुमची कौशल्ये अगदी कमी शब्दात तसेच वाचायला
सोपी अशी पद्धतीने जर नमूद केली, तर ती मुलाखत घेणार्याच्या
लवकर नजरेत येतील आणि आपला Resume निवडला जाण्याची
शक्यता वाढेल.
Curriculum Vitae (CV) -
- ·
Curriculum Vitae म्हणजेच CV
या नावातच आपल्याला समजते की यामध्ये विस्तृत माहिती द्यावयाची आहे.
CV ला पानांची तशी काही मर्यादा नसते. तो २ ते 3 पानांचा किंवा
त्यापेक्षाही मोठा असू शकतो.
- ·
सामान्यतः शैक्षणिक संस्था, रिसर्च
संस्था इ. ठिकाणी CV. मागवतात.
- ·
अर्थातच CV मध्ये शैक्षणिक माहिती, अगदी आपण केलेले प्रोजेक्ट,
रिपोर्ट, रिसर्च सर्व काही नमूद करता येते.
- ·
आपण घेतलेला अनुभव देखील इथे विस्तृत पणे
मांडला जातो. जेणे करून आपला CV वाचून मुलाखत घेणार्याला आपल्या कौशल्याबद्दल अचूक, तंतोतंत समजते जे अशा ठिकाणच्या नोकरीसाठी गरजेचे असते.
Tag-differences of bio data and resume#cv
resume biodata difference#difference between bio data and resume#difference
between cv bio data and resume#difference between bio data resume and c.v#difference
between resume bio data and curriculum vitae#difference between bio data and
curriculum vitae
COMMENTS