राज्यातील मंबुई, ठाणे, नवी मंबुई, पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यकसेवांसाठीच सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना शा
कोरोना Lockdown शिशिल झाल्यानंतर राज्यातील
शाळामध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना
- राज्यातील मंबुई, ठाणे, नवी मंबुई, पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यकसेवांसाठीच सुरु करण्यात
आलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळामध्ये उपस्थित राहण्यामध्ये अडचणीनिर्माण
होऊशकतात. ही बाब विचारात घेता शिक्षकांसाठी वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात येत
आहे.तथापि शाळा सुरू करणेची तयारी व ई लर्निंग बाबत मुख्याध्यापकांनी आठवडयातून
दोन दिवस बोलावल्यास उपस्थित रहावे.
- महिला शिक्षिका , मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, रक्त दाब, हृदयविकार इत्यादी सारखे र्ंभीर आजार असलेले व 55 वर्षावरील पुरूष शिक्षक
यांना शाळेमध्ये न बोलविता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरु होण्याच्या कालावधी पर्यंत
तात्पुरत्या स्वरुपात वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात येत आहे.
- ज्या शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती अत्यावश्यक असेल अशा शिक्षकांना शाळेमध्ये बोलावण्याबाबत संबंधित मुख्याध्यापकांनी / शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. अशा शिक्षकांना शक्यतो आठवडयामध्ये एक किंवा दोन दिवसापेक्षा जास्त वेळा बोलवू नये तसेच एकाच दिवशी सर्व शिक्षकांना बोलवू बोलावू नये.
- ज्या शिक्षकांच्या सेवा कोविड आजारासंबंधित कामकाजासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत संबधित शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी. अन्य आस्थापनेवर समायोजित सरप्लस शिक्षकांनाही मूळ शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घ्यावा.
- ज्या ठिकाणी शाळा क्वारंटाईनसाठी प्रशासनाने ताब्यात घेतल्या असतील त्या ठिकाणी शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येई पर्यंत कोणत्याही शिक्षकांना शाळेत बोलावू नये.
- स्थानिक प्रशासनाच्या समंती शिवाय शिक्षण विभागातील
क्षेत्रीय अधिकाऱ्याने शाळा सुरु करणेबाबत,शिक्षक
उपस्थितीबाबत कोणतेही निर्देश देवू नयेत.
- परिस्थितीनुरूप बदलत्या अध्ययन अध्यापन पध्दतींचा वापर करण्यासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे व संबधित जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन करावे.
COMMENTS