⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षणाचा नवा 'बीड पॅटर्न', विद्यार्थ्यांना Online Free शिक्षण

शिक्षणाचा नवा 'बीड पॅटर्न', विद्यार्थ्यांना Online Free शिक्षण

शिक्षणाचा नवा 'बीड पॅटर्न', विद्यार्थ्यांना Online Free शिक्षण

पुणे येथील वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (VOPA) या सामाजिक संस्थेने बीड जिल्ह्यातील काही नामवंत विषयतज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा शैक्षणिक प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या कामात बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिली. विद्यार्थ्यांना हा प्लॅटफॉर्म http://ssc.vopa.in/ येथे मोफत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या उपक्रमाची वैशिष्ट्ये काय?

  • ·        विद्यार्थ्यांचा स्क्रिन टाईम कमी करण्यासाठी प्रयत्न
  • ·        यासाठी कोणत्याही अॅप्लिकेशन, नोंदणी इत्यादी गोष्टींची गरज नाही. कोणत्याही मोबाईलवर याची उपलब्धता होते.
  • ·        कमीत कमी इंटरनेट स्पीडवर देखील हा प्लॅटफॉर्म चालेल.
  • ·        यात फक्त व्हिडीओ नाही, तर टेक्स्ट, अॅनिमेटेड फोटोजचा वापर.
  • ·        मोबाईलचा उद्देश केवळ शिक्षण पोहचण्यासाठी केला आहे. मात्र, खरं शिक्षण मोबाईलच्या बाहेर वही, पुस्तक, पेन आणि परिसर यांचा वापर व्हावा यावर भर दिला आहे.
  • ·        प्रश्नपत्रिका आणि सराव दिले आहेत.
  • ·        शाळा आणि स्थानिक शिक्षकांची यात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. यात वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत घेण्यास सांगितले आहे आणि शिक्षकांनाही यात मदतीबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.
  • ·        विद्यार्थ्यांना कोठेही क्लिक करावं लागत नाही किंवा इतर पेजवर जावं लागत नाही. त्यामुळे कमीत कमी इंटरनेट आणि विद्यार्थ्यांचं अधिकाधिक लक्ष वेधून घेण्यास मदत होते.
  • ·        यात विद्यार्थ्यांना देखील आपली मतं नोंदवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातून शिक्षकांच्या कामाचं आणि विद्यार्थ्यांच्या सहभाग आणि आकलनाचं मुल्यमापन करता येणार आहे.

वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

 विद्यार्थ्यांनी कसे वापरावे :

  • 1. तुम्हाला ह्या वेबसाईटवर फक्त विषय आणि धड्याचा क्रमांक निवडायचा आहे आणि तुम्हाला तो धडा संपूर्ण एकाच पानावर खाली स्क्रोल करून पाहता येईल.
  • 2. तुमच्या सोयीसाठी प्रत्येक धड्याला काही कृतीसंचांमध्ये विभागले आहे. एका कृतीसंचात तुमच्यासाठी काही सूचना, व्हिडीओ, इमेजेस, ऑनलाईन परीक्षा, घरी करायला गृहपाठ इ. गोष्टी असतील.
  • 3. तुम्ही रोज ‘कोणत्या विषयाचे आणि किती कृतीसंच पूर्ण करायचे’ हे तुमचे शाळेतील शिक्षक तुम्हाला सांगतील.
  • 4. तुम्हाला कोणताही व्हिडीओ पाहण्याआधी किंवा कृती करण्याआधी दिलेल्या सूचना लक्ष देऊन वाचा.
  • 5. यामध्ये तुम्हाला काही अभ्यास ऑनलाईन टेस्ट च्या स्वरुपात असेल, ज्याचे मार्क तुम्हाला लगेच समजतील आणि कुठे चुकले हे देखील समजेल. टेस्ट देऊन झाल्यावर शो रिझल्ट वर क्लिक करा. काही गृहपाठ हा वहीवर करून तुमच्या शिक्षकांना व्हॉट्सप वर पाठवायचा आहे.
  • 6. प्रत्येक धड्याच्या शेवटी तुम्हाला Exit Slip (तुमचा अभिप्राय/ फीडबॅक) भरून द्यायचा आहे. त्यामध्ये तुमच्या शाळेचा VSchool code टाकायचा आहे, तुमच्या शिक्षकांकडून तो मागून घ्या.
  • 7. एखादे पेज व्यवस्थित लोड झाले नाही, एखादी प्रतिमा नीट दिसत नसेल तर पेज परत लोड करा.
  • 8. तुम्ही एखादी इमेज/ आकृती/ नकाशा दोन बोटांनी झूम करून पाहू शकता.
  • 9. नेहमी व्हिडीओ फुल स्क्रीन मोड मध्ये पहा.

 


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम