Admission Procedure for ITI Application Procedure from 1st August राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया यंदा क
ITI ची प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून अर्ज करण्याची पद्धतAdmission Procedure for ITI Application Procedure from 1st August
राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया यंदा केंद्रीभूत ऑनलाईन पद्धतीने (सेंट्रलाइज्ड) करण्यात
येणार आहे. त्यासाठी १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सविस्तर
माहितीपुस्तिका ३१ जुलैपासून संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये PDF स्वरुपात
उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे | Here is how to apply :
- १. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेशअर्ज स्वीकृती केंद्र असतील. अर्ज स्विकृती केंद्रात उमेदवार माहिती/ मार्गदर्शनप्राप्त करु शकतील तसेच प्रवेश प्रक्रियेसंबंधी सेवा प्राप्त करु शकतील.
- २. प्रवेशेच्छुक उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत
देण्यात आलेली माहिती, प्रवेशपध्दती व नियमांचा अभ्यास करुनच
ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा.
३. ऑनलाईनप्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होईल.
४. अर्ज कोणत्याही ऑनलाईन स्त्रोता मधून भरता येईल. उमेदवारांना माहिती पुस्तिकेतील प्रपत्र - 4 मध्ये नमूद शुल्क भरुन अर्ज स्विकृती केंद्रामधून ही सुविधा उपलब्धहोऊ शकेल.
५. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळ यांच्या मार्फत मार्च २०१६ व तद्नंतर घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची माहिती प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर उमेदवारांनी त्यांचा बैठक क्रमांक, परीक्षा वर्ष, परीक्षा सत्र व जन्म दिनांक नोंदविल्यास त्यांची वैयक्तिक माहिती व इयत्ता १० वी परीक्षेतील गुण प्रवेश अर्जात आपोआप नोंदविले जातील (Auto Populate). तथापि, मार्च २०१६ पूर्वी परीक्षेस बसलेल्या वा अन्य परीक्षा मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना सर्व माहिती सादर करणे आवश्यक आहे. - ३. ऑनलाईनप्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होईल.
- ४. अर्ज कोणत्याही ऑनलाईन स्त्रोता मधून भरता येईल. उमेदवारांना माहिती पुस्तिकेतील प्रपत्र - 4 मध्ये नमूद शुल्क भरुन अर्ज स्विकृती केंद्रामधून ही सुविधा उपलब्धहोऊ शकेल.
- ५. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळ यांच्या मार्फत मार्च २०१६ व तद्नंतर घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची माहिती प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर उमेदवारांनी त्यांचा बैठक क्रमांक, परीक्षा वर्ष, परीक्षा सत्र व जन्म दिनांक नोंदविल्यास त्यांची वैयक्तिक माहिती व इयत्ता १० वी परीक्षेतील गुण प्रवेश अर्जात आपोआप नोंदविले जातील (Auto Populate). तथापि, मार्च २०१६ पूर्वी परीक्षेस बसलेल्या वा अन्य परीक्षा मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना सर्व माहिती सादर करणे आवश्यक आहे.
- ६. प्रवेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर)” नोंदविणे अनिवार्य आहे. एका
मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत
उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One
Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी
आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात “Primary Mobile
Number” म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक
प्रवेश प्रक्रिये दरम्यान बदलता येणार नाही.
७. ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल.
८. उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन “Admission Activities” या मथाळ्याखाली “Application Form” वर क्लिक करुन संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनच्छ: तपासून घ्यावे.
९. प्रवेश अर्जातील नमूद सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे वआवश्यक असल्यास प्रवेश अर्जाची छापील प्रत (Print Out) घ्यावी. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतरच प्रवेश अर्ज निश्चित (Confirm) होईल. - ७. ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल.
- ८. उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन “Admission Activities” या मथाळ्याखाली “Application Form” वर क्लिक करुन संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनच्छ: तपासून घ्यावे.
- ९. प्रवेश अर्जातील नमूद सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे वआवश्यक असल्यास प्रवेश अर्जाची छापील प्रत (Print Out) घ्यावी. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतरच प्रवेश अर्ज निश्चित (Confirm) होईल.
- १० प्रवेशअर्ज शुल्क:
- राखीव प्रवर्ग उमेदवार (Unreserved Category): रु. १५०
- महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु. ३००
- राखीव प्रवर्ग उमेदवार (Reserved Category): रु. १००
- अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential
Indian):रु. ५००
११. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर प्रवेश अर्जातिल माहिती गोठविण्यात येईल व तद्नंतर प्रवेश अर्जातील कोणत्याही माहितीत बदल (Edit), नव्याने समावेश (Add) वा गाळणे (Delete) शक्य होणार नाही.
१२. तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जातकोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
१३. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले आहे त्याच प्रवेश अर्जाचा पुढील प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाईल. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले नसतील असे अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल. - ११. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर प्रवेश अर्जातिल माहिती गोठविण्यात येईल व तद्नंतर प्रवेश अर्जातील कोणत्याही माहितीत बदल (Edit), नव्याने समावेश (Add) वा गाळणे (Delete) शक्य होणार नाही.
- १२. तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जातकोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
- १३. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले आहे त्याच प्रवेश अर्जाचा पुढील प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाईल. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले नसतील असे अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल.
- १४. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी
व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादरकरण्यासाठी प्रवेशसंकेतस्थळावर
नोंदणीक्रमांक (Registration Number) वपासवर्ड (Password)
व्दारे प्रवेश (Login) करुन “Submit/
Change Options/ Preferences” व्दारे सादर करावेत.
१५. पहिल्याप्रवेशफेरीसाठी व्यवसायवसंस्थानिहायविकल्पवप्राधान्यपूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापीलप्रत (Print Out) घ्यावी.
१६. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेशप्रक्रीयेतुन बाद होईल.
१७. अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखील १ ऑगस्ट, २०२० पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेशफेरीसाठी व्यवसायव संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे. - १५. पहिल्याप्रवेशफेरीसाठी व्यवसायवसंस्थानिहायविकल्पवप्राधान्यपूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापीलप्रत (Print Out) घ्यावी.
- १६. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेशप्रक्रीयेतुन बाद होईल.
- १७. अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखील १ ऑगस्ट, २०२० पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेशफेरीसाठी व्यवसायव संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे.
- १८. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना
निवडपत्र (Allotment Letter) Online उपलब्ध करुन
देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या Account ला Login
करुन निवडपत्राची प्रिंट घेवून निवड झालेल्या औ.प्र.संस्थेत
प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे. उमेदवारांना निवडपत्राची (Allotment
Letter)छापीलप्रत (Print Out) ज्या संस्थेत
त्याची निवड झाली त्या संस्थेत देखिल घेता येईल.
१९. उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करतांना प्रवेश अर्जातिल दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक दस्तऐवज/ कागदपत्रे संबंधीत संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज/ कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-3) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज/ कागदपत्रे सादर करु न शकल्यास व/वा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यांतुन बाद करण्यात येईल. - १९. उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करतांना प्रवेश अर्जातिल दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक दस्तऐवज/ कागदपत्रे संबंधीत संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज/ कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-3) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज/ कागदपत्रे सादर करु न शकल्यास व/वा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यांतुन बाद करण्यात येईल.
tag -admission procedure for iti,admission
process for iti in maharashtra,admission process for iti,admission process for
iti courses,admission procedure in iti delhi,procedure for taking admission in
iti,admission process for iti in maharashtra,iti admission process in
maharashtra 2020,diploma admission process after iti in
maharashtra,admission process for iti in maharashtra
COMMENTS