Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा !

SHARE:

Beware from fraud Online! महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन कोरोना महामारीच्या काळात नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या अनेक युक्त्यांचा वा

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा ! Beware from fraud Online!

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा !

Beware from fraud Online!

महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन

कोरोना
महामारीच्या काळात नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या अनेक युक्त्यांचा वापर सायबर भामट्यांनी सुरू केला आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने यातील सातत्याने वापरल्या जाणाऱ्या गैरपद्धती वा युक्त्या शोधून काढल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत.
  • १) कोविड १९ या प्रकारात तुम्हाला एक ई-मेल अथवा मेसेज येतो की तुम्ही जर Amazon Gift Coupon खरेदी केले तर त्याची रक्कम कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी वापरली जाईल. अशा आशयाचा मजकूर व एक लिंक दिलेली असते. ही लिंक Amazon.com सारखी पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते. याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.
  • २) Job Offer Scam: या प्रकारात तुम्हाला एक ई-मेल किंवा मेसेज येतो की तुम्ही सध्याच्या काळात घरबसल्या काम करुन पैसे मिळवू शकता. त्यासाठी एक लिंक दिली जाते. ही लिंक Amazon.com सारखी पण फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.
  • ३) ऑनलाईन खरेदी स्कॅम : बहुतांश नागरिक ऑनलाईन खरेदीला पसंती देतात. याचा फायदा घेऊन एखादी फेक वस्तू जसे की मोबाईल, पुस्तके, अन्य गृह उपयोगी वस्तू किंवा अगदी पाळीव प्राणी विकायला आहेत अशी जाहिरात करतात. ही लिंक Amazon.com किंवा अन्य e-portal सारखी दिसायला पण फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.
  • ४) Boss Scam: कधी- कधी तुम्हाला तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाने एखादा ई-मेल किंवा मेसेज येतो कि तुमच्या वरिष्ठांनी तुमच्यासाठी Amazon gift card खरेदी केले आहे, तर सोबतच्या लिंकवर क्लिक करुन ते redeem करा. सदर लिंक Amazon.com सारखी पण फेक लिंक असते.तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.
  • ५) टॅक्स स्कॅम : यामध्ये नागरिकांना एक ई-मेल किंवा मेसेज येतो कि तुम्ही काही कर (Tax) भरायचा बाकी आहे व तो तुम्ही सोबतच्या लिंकवर क्लिक करुन एका विशिष्ट तारखेपर्यंत भरा अन्यथा तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.सदर लिंक ही सरकारी कर भरायच्या लिंक सारखीच दिसते, पण  फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते त्याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.
  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,
  • १) जर वरील नमूद प्रकारचे काही ई-मेल किंवा मेसेज किंवा फोन आले तर त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका.
  • २) सध्याच्या काळात जर कोणी तुम्हाला घर बसल्या पैसे मिळवू शकता असे सांगत असतील तर लगेच विश्वास ठेऊ नका तुम्ही फसविले जाण्याची शक्यता अधिक आहे.
  • ३) ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा. एखादी वस्तू जर कोणी बाजारभावापेक्षा खूप स्वस्त विकत असेल, तर  सतर्क व्हा.
  • ४) इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्व काही माहिती खरीच असेल असे नाही.
  • ५) जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी gift card coupon भेट दिली आहे, असा काही ई-मेल किंवा मेसेज आला तर त्याची वरिष्ठांकडून खात्री करून घ्यावी.
जर तुमची वरील नमूद प्रकाराने किंवा अन्य कोणत्याही प्रकारची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवा, तसेच www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण माहिती द्यावी.
असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.


COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,137,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,109,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,369,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,627,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,524,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,779,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,512,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,Scholarship,31,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा !
ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा !
Beware from fraud Online! महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन कोरोना महामारीच्या काळात नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या अनेक युक्त्यांचा वा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6AOZva-UN8n94RvRqeSk2QGRyWsv49B3XfqMlC5dB4C0ZLc-UcBglwWOxjbrsxJechPSysZ7yiydeU3eiB3Z1EBPHfj41VzNcrAe_lSPr0gPcog6evoKDXpfV0g0Y7Oj3EAdRGcsfL1U/d/cyber-security-data-protection-business-concept-virtual-screen-shield-protect-icon-internet-privacy-safety-antivirus-154068082-750x375.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6AOZva-UN8n94RvRqeSk2QGRyWsv49B3XfqMlC5dB4C0ZLc-UcBglwWOxjbrsxJechPSysZ7yiydeU3eiB3Z1EBPHfj41VzNcrAe_lSPr0gPcog6evoKDXpfV0g0Y7Oj3EAdRGcsfL1U/s72-c-d/cyber-security-data-protection-business-concept-virtual-screen-shield-protect-icon-internet-privacy-safety-antivirus-154068082-750x375.webp
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2020/07/Beware-from-fraud-Online-by-thakare-blog.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2020/07/Beware-from-fraud-Online-by-thakare-blog.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS