Reduced syllabus for the academic year 2020-2021कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरुझालेल्या न
शैक्षणिक वर्ष २०२० -२०२१ साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम
Reduced syllabus for the academic year 2020-2021
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१
मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु
झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये
यासाठी विविध पातळीवर शासन प्रयत्न
करत आहे. त्या आधाराने शासनाने पाठ्यक्रम कमी करण्याबाबत
पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला
आहे.
- १. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड) यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील २२, माध्यमिक स्तरावरील २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ असे एकूण १०१ विषयांचा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात येत आहे.
- २. पाठ्यक्रमातून २५ % भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जावू नयेत.
- ३. भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत.
- ४. इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे.
- ५. शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम/प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे.
- ६. प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आहायास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे.
- ७. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिके मधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे.
- ८. इयत्ता १ली ते १२वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.
- ९. शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२० -२०२१ साठी कमी करण्यात आलेला
पाठ्यक्रम |
|
इयत्ता १ ली ते ८ वी |
|
इयत्ता ९ वी ते १० वी |
|
इयत्ता ११ वी ते १२ वी |
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS