New Revised Schedule of 11th Online Admission Announced, Login ID Password will be available from today
11 वी ऑनलाईन प्रवेशाचे नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर, आजपासून लॉग इन आयडी पासवर्ड मिळणार
New Revised Schedule of 11th Online
Admission Announced, Login ID Password will be available from today
11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा
एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. आज, 26 जुलैपासून
विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहेत.
तर 1 ऑगस्टपासून
विद्यार्थ्याला 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. राज्यातील मुंबई महानगर, पुणे नाशिक,
औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात 11
वीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
▪मात्र सदर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 1 भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे.
आधीच्या वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्जाचा भाग 1 भरायचा
होता, मात्र आता हा अर्ज 1 ऑगस्टपासून
विद्यार्थी भरणार आहेत.
नवीन वेळापत्रक
- ▪दिनांक 26 जुलै 2020 पासून - 11 वी
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे. लॉग इन आयडी मिळवून पासवर्ड तयार
करणे.
- ▪दिनांक 1 ऑगस्ट
पासून - दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून
लॉग इन करून 11 वी प्रवेशसाठीचा अर्ज भाग - 1 भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक करणे.
- ▪अर्जातील माहिती
शाळा, मार्गदर्शन केंद्रवरून प्रमाणित करून घेणे
- ▪विद्यार्थी
प्रवेश अर्जातील माहिती तपासून/ verify करून अर्ज पूर्णपणे
भरणे
- ▪10 वी बोर्डाचा
निकाल जाहीर झाल्यानंतर भाग- 2 महाविद्यालय पसंती क्रमांक
भरणे
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला
खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
What’s App- Next
Update Group
Telegram - https://telegram.me/aapalathakare
Facebook Page- fb.me/thakareblog
Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
11 वी प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर
Revised schedule of 11th admission announced
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची
आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा येत्या २६ जुलैपासून उपलब्ध करून दिली जाणार
आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी प्रवेशाचे
सुधारित वेळापत्रक मंगळवारी उशीरा जाहीर करण्यात आले.
पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड,
नाशिक, औरंगाबाद, अमरावती,
नागपुर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी
केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल.
नोंदणी प्रक्रिया https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर आजपासून सुरू करण्यात येत आहे.
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
- २२ जुलैपर्यंत - उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे : मुख्याध्यापक/ प्राचार्य
- २४ जुलैपर्यंत - उच्च माध्यमिक शाळा/
कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून ऑनलाईन प्रमाणित/ व्हेरिफाय करणे : विभागीय शिक्षण उपसंचालक
- २६ जुलैपासून - अकरावी प्रवेशासाठी
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज भाग - एक भरणे आणि
अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा/ मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला
अर्ज व्हेरिफाईड झाला आहे याची खात्री करणे : विद्यार्थी
स्वतः, पालकांच्या मदतीने
- २७ जुलैपासून - विद्यार्थी प्रवेश
अर्जातील माहिती, भाग- एक तपासून व्हेरिफाय करणे (आवश्यक
असल्यास विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधणे) : संबंधित शाळा/ मार्गदर्शन केंद्र
- - विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदविणे व सबमिट / लॉक करणे (नवीन अर्ज भाग -एक सुध्दा भरता येईल) : कालावधी राज्य मंडळाचा दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येईल : विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने
अर्ज भरण्याचा करा सराव/ Practice filling out the application
विद्यार्थ्यांना मूळ अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागू नये,
अर्ज भरण्याचा सराव व्हावा, मुळ अर्ज भरताना
चुका होऊ नयेत, यासाठी सराव अर्ज भरण्याची सोय उपल5 करून देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते
प्रारूप संकेतस्थळावर सुविधा देण्यात येत आहे. त्यात भरलेली माहिती २४ जुलैनंतर
नष्ट करण्यात येईल. केवळ सरावासाठी १६ जुलैपासून ते २४ जुलैपर्यंत संकेतस्थळावर Mock.Demo.Registration
तपासा. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार
आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक
दिनकर पाटील यांनी दिली.
Tag-11th online admission process,11th online admission process akola,11th
online admission process 2020-21,11th online admission process 2020-21,11th online admission process
part 2,11th online admission
process pune,11th online admission process 2020-21 timetable,11th
online admission process aurangabad,11th online admission
process maharashtra,11th online admission process mumbai
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS