⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

११ वी चे अॅडमिशनसाठीचं वेळपत्रक जाहीर

Mumbai metropolitan area, Pune-Pimpri Chinchwad, Nashik, Aurangabad, Amravati, Nagpur municipal area etc. 11th online admission process started

११ वी चे अॅडमिशनसाठीचं वेळपत्रक जाहीर
Schedule for 11th class admission announced

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रक्रिया सुरू करण्यासाठी बुधवारी (ता.१) वेळापत्रक जाहीर केले आहे. गुरुवार (ता.२)पासून कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन नोंदणी संकेतस्थळावर करता येणार आहे, तर १५ जुलै पासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

'कोरोना' मुळे इयत्ता १०वीचा निकाल उशीरा लागणार असल्याने यंदा केंद्रीय पद्धतीने ११वी प्रवेश करू नयेत, ऑफलाईन प्रवेशास मान्यता द्यावी अशी मागणी शिक्षण संस्थांनी लावून धरली होती.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण विभागाने ११वी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची अधिक माहिती www.dydepune.com व इ .११वी ऑनलाईन प्रवेशाच्या https://pune.11thadmission.org.inसंकेतस्थळावर उपलब्ध आहे.

११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे:-

  • - उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांची संकेतस्थळावर नोंदणी : २ जुलै ते १५ जुलै
  • - उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदविलेली माहिती तपासणी करून ऑनलाईन अंतिम करणे : २ जुलै ते १६ जुलै
  • - विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भाग एक भरणे, मार्गदर्शन केंद्र निवडणे, अर्ज मंजूर झाला आहे याची खात्री करणे : १५ जुलै ते १० वीचा निकाल लागे पर्यंत
  • - विद्यार्थी अर्ज भाग १ तपासणी करून तो मंजूर करणे व आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्याशी संपर्क साधणे : १६ जुलै ते १०वीचा निकाल लागे पर्यंत
  • - विद्यार्थ्यांनी भाग २ (पसंतीक्रम) भरणे व अर्ज सबमिट करणे (भाग १ सह) : १०वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यापासून सुरू.

मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना

  • - पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ .११ वी चे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होतील. या प्रक्रियेत सर्व मान्यता प्राप्त संस्था सहभागी होतील, याची दक्षता घ्यावी
  • - इ .११ वी चे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने दिल्यास ते अमान्य ठरतील.
  • - आरक्षणाबाबत एसईबीसी -१२ टक्के व दिव्यांग -०४ टक्के, इसहाऊस कोटा -१० टक्के, व्यवस्थापन कोटा -०५ टक्के, अल्पसंख्यांक शाळांमध्ये कोटा -५० टक्के) याबाबत जागृती करावी.
  • - कोणत्याही कोट्यातुन प्रवेश हवा असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यास केंद्रीय ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
  • - कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यानुषंगाने सर्व नियम पाळणे आवश्यक आहे.
  • - शाळा/ महाविद्यालयांची नोंदणी सुरु झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करावी. कोणालाही प्रत्यक्षात बोलविण्याची गरज नाही.
  • - प्रवेश माहिती पुस्तिका छापील स्वरुपात दिली जाणार नाही. ऑनलाईन नोंदणी करताना विद्यार्थ्याना लॉगीन आयडी सह माहिती पुस्तिकेची साॅफ्टकाॅपी प्रत होईल.
  • - प्रवेश शुल्क ऑनलाईन जमा करावे लागणार.
  • - मुख्याध्यापक व तंत्र सहाय्यक यांचे प्रशिक्षण, पालक व विद्यार्थ्यासाठी उद्बोधन वर्ग घेण्यात येतील,
  • त्याचे वेळापत्रक वेळोवेळी जाहीर केले जाईल.
  • - प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी होणार नाही.

 


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम