⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

निवृत्तीवेतनधारकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर गणनेसाठी आवाहन

निवृत्तीवेतनधारकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर गणनेसाठी आवाहन

निवृत्तीवेतनधारकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर गणनेसाठी आयकर वसुलीच्या जुनी कर पद्धती (Old Tax Regime) आणि नवी कर पद्धती (New Tax Regime)
दोन प्रकारांपैकी उचित पर्याय निवडून त्याची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी ईमेलद्वारे अधिदान व लेखा कार्यालयाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आयकर वसुलीचे नवीन सेक्शन ११५ बीएसी नुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर गणनेसाठी जुनी कर पद्धती (Old Tax Regime) आणि नवी कर पद्धती (New Tax Regime) असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. यापैकी योग्य असणारा पर्याय निवडावा. त्यासाठी आवश्यकता भासल्यास नजीकच्या सनदी लेखापालांची मदत घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

निवड केलेला पर्याय अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांना apaopensdat.mum-mh@gov.in या ई-मेलवर आपल्या नाव, पीपीओ क्रमांक, बँक व खाते या माहितीसहित ३० सप्टेंबर २०२० पूर्वी कळविणे आवश्यक आहे. या पर्यायानुसार देय होणारी टीडीएस वजाती करण्यात येणार आहे. टॅक्स पद्धतीची निवड वेळेत न कळविणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची टीडीएस वजाती पूर्वीप्रमाणेच म्हणजे जुन्या कर पद्धतीनुसार केली जाणार आहे, असे अधिदान व लेखा अधिकारी वैभव राजेघाटगे यांनी कळविले आहे.

निवृत्तीवेतनधारकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर गणनेसाठी आयकर वसुलीच्या नवीन किंवा जुन्या प्रकारांपैकी उचित पर्याय निवडून त्याची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी apaopensdat.mum-mh@gov.in या ईमेलद्वारे अधिदान व लेखा कार्यालयाला कळविण्याचे आवाहन.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम