⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

लक्षात घ्या.... टिलीमिलीच्या वेळापत्रकामध्ये सोमवारपासून बदल

लक्षात घ्या.... टिलीमिलीच्या वेळापत्रकामध्ये सोमवारपासून बदल
Note .... Changes in Tilimili schedule

पुण्यात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे टिलीमिलीया दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मालिकेचे चित्रीकरण दिनांक १३ जुलै ते २३ जुलै २०२० या काळात बंद ठेवावे लागल्याने मालिकेच्या येत्या आठवड्यापासूनच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करणे भाग पडले. कृपया वेळापत्रकातील या बदलाची माहिती आपल्या परिचित सर्व शिक्षकांना द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांनाही हा बदल कळवावा ही कळकळीची विनंती.

टीलीमिलीच्या वेळापत्रकामध्ये झालेला बदल : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या शैक्षणिक कार्यक्रम टीलीमिली हा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे तरी त्यामध्ये विद्यार्थ्यांचा खंड पडू नये  त्यासाठी टीलीमिली कार्यक्रमाच्या प्रसिद्धीच्या वेळेमध्ये थोडा बदल झालेला आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे आणि आपल्या शाळेच्या शैक्षणिक ग्रुप वरती याची सूचना करावयची आहे.

वेळापत्रकामध्ये झालेला बदल खालील प्रमाणे :

बदललेले इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन  वेळापत्रक याप्रमाणे असेल - 

इयत्ता ५ वी ते ८ वी साठी सोमवार दि. ०३ ऑगस्ट २०२० ते सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत  

सकाळी ०७.३० ते ०८.३० इयत्ता ८ वी, सकाळी ०९.०० ते १०.०० इयत्ता ७ वी, सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता ६ वी आणि सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता ५ वी

 (दिनांक १५ ऑगस्ट रोजी महामालिकेचे भाग प्रसारित होणार नाहीत.)

इयत्ता १ ली ते ४ थी साठी दि. ०१ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० पर्यंत

सकाळी ०७.३० ते ०८.३० इयत्ता ४ थी, सकाळी ०९.०० ते १०.०० इयत्ता ३ री, सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता २ री आणि सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता १ ली 

वर दर्शविलेल्या प्रत्येकी एक तासात त्या त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होतील व त्यांत पाच मिनिटांचे मध्यांतर असेल.


पहिली ते चौथी चे भाग ०३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या मध्ये प्रसारित होणार नाहीत हे भाग ३१ ऑगस्ट ते 26 सप्टेंबर २०२० यामध्ये रोज २ भागात प्रकाशित होतील .


पाचवी ते आठवी चे भाग ०३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट यामध्ये रोज २ भाग प्रकाशित होणार आहे


सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम