⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

ध्वज संहिता,राष्ट्रध्वजाची काळजी, प्रतिज्ञा आणि कायदा

 

ध्वज संहिता अधिनियम,ध्वज संहिता मराठी,ध्वज संहिता का संबंध किससे है,ध्वज संहिता का संबंध,ध्वज संहिता 2002 के नियम,ध्वज संहिता 2002 pdf,भारतीय ध्वज संहिता 2002,ध्वज संहिता pdf,ध्वज संहिता मराठी pdf,ध्वज संहिता 2002 pdf

ध्वज संहिता ,राष्ट्रध्वजाची काळजी, प्रतिज्ञा आणि कायदा | Flag Code, National Flag Care, Pledge and Law

राष्ट्रध्वजाबद्दल कोणती काळजी घ्यावी ?

  • राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला नसावा
  • ठराविक दिवसाशिवाय वाहनांवर तिरंगा लावू नये
  • तिरंग्याच्या ध्वजदंडावर दुसरा झेंडा फडकवू नये
  • राष्ट्रध्वजावर हार, फुलं अशा वस्तू ठेवू नका
  • सुर्योदयानंतर ध्वज फडकवावा व सूर्यास्ताआगोदर उतरवावा
  • पताका म्हणून शोभेसाठी वापरू नये
  • रुमाल, नॅपकीन, ड्रेसवर तिरंग्याचं चित्र नसावं
  • जमिनीवर पडू देऊ नये
  • मंच सजवणं, पडदा लावण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये.

 

राष्ट्रध्वज प्रतिज्ञा 

मी राष्ट्रध्वजासाठी आणि तो ज्याचे प्रतीक आहे, त्या सार्वभौव समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो. अशी प्रतिज्ञा केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार तिरंग्यासमोर हात जोडून संस्था, महाविद्यालयं, सरकारी कार्यालयं, शाळा, शिबिरात म्हणणं सक्तीचं आहे. मात्र अनेक ठिकाणी याची अमलबजावणी केली जात नसल्याचंच दिसतं.

काय म्हणतो कायदा 

राष्ट्रध्वजाच्या बोधचिन्हाचा व नाव अनुचित वापराचा प्रतिबंध अधिनियम १९५०आणि राष्ट्रप्रतिष्ठा अवमान अधिनियम १९७१या कायद्याचा भंग केल्यास दोषींना दंड होऊ शकतो. ज्यांच्यावर आगोदरच अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे, त्यांनी परत चूक केल्यास ३ र्वष तुरुंगाची हवा खावी लागते. त्याचप्रमाणे अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे अधिकार वरिष्ठांना आहेत.

ध्वज संहिता २००६

 

 

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.

ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

Tag-ध्वज संहिता अधिनियम,ध्वज संहिता मराठी,ध्वज संहिता का संबंध किससे है,ध्वज संहिता का संबंध,ध्वज संहिता 2002 के नियम,ध्वज संहिता 2002 pdf,भारतीय ध्वज संहिता 2002,ध्वज संहिता pdf,ध्वज संहिता मराठी pdf,ध्वज संहिता 2002 pdf

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम